राज्यघटना आणि लोकशाही आमच्यासाठी सर्वोच्च आहे: अध्यक्ष

79 व्या स्वातंत्र्य दिनाची पार्श्वभूमी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला केले संबोधित

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. लोकशाहीला मजबूती मिळू शकेल, अशा संस्थांची आम्ही निर्मिती केली आहे. आमच्यासाठी आमची राज्यघटना आणि आमची लोकशाही सर्वोच्च असल्याचे उद्गार राष्ट्रपती मुर्मू यांनी काढले आहेत. जेव्हा उद्या (शुक्रवार) आम्ही तिरंग्याला अभिवादन करत असू तेव्हा देशासाठी सर्वोच्च बलिदान केलेल्या स्वातंत्र्यसेनानींना श्रद्धांजली वाहत असू, असे वक्तव्य राष्ट्रपतींनी केले आहे.

तसेच राष्ट्रपतींनी नागरिकांच्या रक्षणासाठी शक्य ती सर्व पावले उचलू असे म्हणत भारतीय सैन्याच्या यशस्वी मोहिमेचा उल्लेख केला आहे. चालू वर्षात आम्हाला दहशतवादाचा दंश सहन करावा लागला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला भारताने पोलादी पद्धतीने प्रत्युत्तर दिले. सैन्य कारवाई ‘ऑपरेशन सिंदर’द्वारे आम्ही भारताच्या सार्वभौमत्वाची सुरक्षा करण्यास सक्षम आहोत हे जगाला दाखवून दिले आहे. सैन्याने कारवाई करत सीमापार दहशतवादी अ•s नष्ट केले आहेत. आमची एकताच आमच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईची सर्वात मोठी शक्ती आहे. भारताची एकता आमच्या शत्रूला सर्वात चोख प्रत्युत्तर असल्याचे वक्तव्य राष्ट्रपतींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केले आहे.

भूतकाळ पाहता आमच्या देशाच्या फाळणीमुळे झालेल्या वेदना कदापिही विसरल्या जाऊ नयेत. आज (गुरुवारी) आम्ही विभाजन विभीषिका स्मृती दिन पाळला आहे. फाळणीमुळे भयावह हिंसा झाली आणि लाखो लोकांना विस्थापित होण्यास भाग पाडले गेले. आज आम्ही इतिहासातील चुकांचे शिकार झालेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पित करतो, असे मुर्मू यांनी म्हटले आहे.

न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व

आमच्या लोकशाहीला सुदृढ राखणारे 4 स्तंभ असलेल्या 4 मूल्यांचा उल्लेख आमच्या राज्यघटनेत आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही ती मूल्ये आहेत. आमच्या संस्कृतीची ही मूल्ये स्वातंत्र्यलढ्यादरम्यान अंगिकारण्यात आली. या सर्व मूल्यांच्या मूळाशी व्यक्तीच्या प्रतिष्ठेची धारणा विद्यमान असल्याचे माझे मानणे असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी वक्तव्य केले आहे.

बलिदानाच्या बळावर स्वातंत्र्य प्राप्त

बलिदानाच्या बळावर 78 वर्षांपूर्वी 15 ऑगस्टच्या दिनी भारताने स्वातंत्र्य प्राप्त केले होते. स्वातंत्र्य प्राप्त केल्यावर आम्ही एका अशा मार्गावर वाटचाल केली, ज्यात सर्व प्रौढांना मतदानाचा अधिकार होतो. अनेक लोकशाही व्यवस्थांमध्ये त्या काळात लिंग, धर्म आणि अन्य आधारांवर लोकांच्या मतदानावर निर्बंध होते, परंतु आमच्या देशाने सर्वांना मतदानाचा अधिकार देण्याचा योग्य मार्ग निवडला. अनेक आव्हानानंतरही भारतीयांनी लोकशाहीला यशस्वीपणे अवलंबिले असल्याचे उद्गार मुर्मू यांनी काढले आहेत.

सर्व समान, सर्वांसोबत प्रतिष्ठापूर्वक वर्तन

प्रत्येक व्यक्ती समान आणि स्वत:सोबत प्रतिष्ठापूर्वक वर्तन व्हावे हा सर्वांचा अधिकार आहे. आरोग्य सेवा आणि शिक्षण सुविधेपर्यंत सर्वांना समान स्वरुपात पोहोचता यावे. सर्वांना समान संधी मिळाव्यात. पारंपरिक व्यवस्थेमुळे जे वंचित ठरले होते, त्यांना मदतीची गरज होती, या मूल्यांना सर्वतोपरी ठेवत आम्ही 1947 मध्ये एक नवी यात्रा सुरू केली असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

काश्मीर खोऱ्यात रेल्वेजाळे

काश्मीर खोऱ्याशी रेल्वेसंपर्काचा शुभारंभ करणे एक प्रमुख कामगिरी आहे. उर्वरित भारतासोबत खोऱ्याचा रेल्वेसंपर्क त्या क्षेत्रात व्यापार आणि पर्यटनाला चालना देणार आहे. तर 55 कोटी लोकांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. देशात वेगाने शहरीकरण होत आहे, मेट्रो रेल्वे प्रकल्पांचा वेगाने विस्तार होतोय. याचबरोबर महामार्गांचे जाळे विस्तारत चालले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सर्व गावांमध्ये पेयजल पोहोचू लागल्याचे राष्ट्रपतींनी स्वत:च्या भाषणात म्हटले आहे.

Comments are closed.