Ratnagiri News – खेड जगबुडी पुलावरून कंटेनर थेट नदीपात्रात कोसळला
मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या खेडमध्ये एक कंटेनर पुलावरून थेट जगबुडी नदीच्या पात्रात कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान घडली. अद्याप या अपघाताबाबत सविस्तर माहिती हाती आलेली नाही. तसेच या दुर्घटनेत जीवितहानी किंवा इतर काही हानी झाली आहे का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीचा हा पूल अत्यंत धोकादायक पूल म्हणून ओळखला जातो. यापूर्वीदेखील या पुलावर अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. या धोकादायक पुलामुळे शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक पातळीवर हालचाली सुरू आहेत.
Comments are closed.