Contract workers embezzled Rs 22 crores at the Divisional Sports Complex in Chhatrapati Sambhajinagar rrp


छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तब्बल 22 कोटींचा गंडा घाडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 13 हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या मदतीने क्रीडा संकुलात हा घोटाळा केला.

छत्रपती संभाजीनगर : येथील विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तब्बल 22 कोटींचा गंडा घाडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 13 हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या मदतीने क्रीडा संकुलात हा घोटाळा केला. (Contract workers embezzled Rs 22 crores at the Divisional Sports Complex in Chhatrapati Sambhajinagar)

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात काम करणाऱ्या आरोपी हर्षकुमार क्षीरसागर, यशोदा शेट्टी आणि तिचा पती बीके जीवन या तिघांनी 21 कोटी 59 लाख 38 हजारांचा घोटाळा केला आहे. क्रीडा संकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागर हा सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र कंत्राटी कर्मचाऱ्याने गंडा घालून कमावलेल्या पैशांतून आलिशान कार आणि बाईक खरेदी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये 4 बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे. तर शहरातल्या एका नामांकित ज्वेलर्सकडे डायमंडचा चष्मा बनवण्याची ऑर्डर दिली आहे. या घोटाळ्यातील दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने 35 लाख रुपये किंमतीची कार खरेदी केली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

– Advertisement –

हेही वाचा – Crime : माजी क्रिकेटरच्या वडिलांनी 34 बनावट खात्यांमधून घातला 1.25 कोटींचा गंडा; आता 7 वर्षांची शिक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, घोटाळ्यातील दोन्ही आरोपींनी क्रीडा संकुलाला सरकारकडून दिला जाणारा निधी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून स्वत:च्या खात्यावर वळवला होता. यासाठी त्यांनी क्रीडा संकुलाच्या नावाने एका बँकेत खाते उघडले होते. या खात्याचे व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीने होत होते. यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली होती. ही कागदपत्रे बँकेला देताना त्यांनी स्वत:चा मोबाइल क्रमांक इंटरनेट बँकिगसाठी दिला होता. त्यानंतर क्रीडा संकुलाची रक्कम स्वत:च्या खात्यावर वळवत होते. तब्बल 6 महिन्यांनंतर विभागीय उपसंचालकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर कोटींचा घोटाळा समोर आला.

– Advertisement –

घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांच्या नाव आणि सहीचा वापर 

दरम्यान, आरोपी कंत्राटी कर्मचारी क्रीडा संकुलात नोंदी, पावती बूक लिहिणे आणि बँकेचे पत्रव्यवहार यासारखी कामे करत होते. त्यांनी घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांच्या नाव आणि सहीचा वापर करून बनावट कागदपत्रे बँकेच्या खात्याला आपल्या क्रमांकासह जोडला होता. त्यानंतर नेट बँकिंगच्या माध्यमातून ते क्रीडा संकुलाला मिळणाऱ्या निधीतून काही रुपये आपल्या खात्यात फिरवत होते. गेल्या वर्षभरात क्षीरसागर आणि शेट्टी यांच्या खात्यात 59 कोटी रुपये आले. ही रक्कम त्यांनी इतरत्र वळवली. मात्र या घोटाळ्याची कुणकुण क्रीडा संकुलाच्या प्रशासनाला कशी लागली नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हेही वाचा – Cyber Crime : सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्‍यास अटक; मालाडच्या जोडप्याला 36 लाखांचा गंडा


Edited By Rohit Patil



Source link

Comments are closed.