वादग्रस्त व्हायरल क्लिप, राष्ट्रवादीचा आणखी एक मंत्री अडचणीत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वादग्रस्त व्हायरल क्लिपमुळे महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत आल्याची चर्चा आहे. या व्हायरल क्लिपमधील व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ असल्याचा दावा काही वृत्त वाहिन्या आणि समाज माध्यमांतून करण्यात येत आहे.

आज संध्याकाळी अचानक एक क्लिप व्हायरल झाली. समाज माध्यमे आणि वृत्त वाहिन्यांतून नरहरी झिरवाळ यांचे नाव या क्लिपशी जोडले गेले. मात्र या क्लिपमध्ये झिरवाळ दिसत आहेत, या दाव्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. झिरवाळ यांनी अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. दरम्यान, विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपता संपता व्हायरल झालेल्या या क्लिपमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Comments are closed.