‘गौतम गंभीरचा आवडता खेळाडू आहे म्हणून’, माजी निवडकर्त्याच्या विधानावर प्रशिक्षक गंभीर यांचा संताप!
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवडकर्ते आणि दिग्गज खेळाडू क्रिस श्रीकांत (Krushnamachari Shrikant) वर संतापले आहेत. गंभीर म्हणाले की, एका 23 वर्षांच्या उभरत्या क्रिकेटपटूवर निशाणा साधणे अत्यंत लाजीरवाणे आहे.
काही दिवसांपूर्वीच, क्रिस श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर हर्षित राणाला (Krushnamachari Shrikant on harshit Rana) ऑस्ट्रेलियाच्या टूरवर घेण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले होते की, हर्षित राणा फक्त गंभीरचा ‘फेवरेट प्लेअर’ असल्यामुळेच टीममध्ये आहे. श्रीकांत यांची ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाली होती.
गौतम गंभीर यांनी भारत विरुद्ध वेस्टइंडीज दुसऱ्या कसोटीनंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटले, हे सगळं खूप लाजीरवाणं आहे की, फक्त यूट्यूब चॅनेलसाठी 23 वर्षाच्या खेळाडूला निशाणा बनवलं जात आहे. हर्षितचे वडील कोणतेही माजी चेअरमन, माजी क्रिकेटपटू नाहीत. त्याने आपली क्षमता दाखवून क्रिकेट खेळलं आहे आणि भविष्यकाळातही असेच करेल. सोशल मीडियावर 23 वर्षाच्या खेळाडूबाबत अशा प्रकारच्या गोष्टी केल्यास, त्याच्या मानसिकतेवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल.
गंभीर फक्त एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी क्रिस श्रीकांतवर थेट टोमणा साधत म्हटले, कल्पना करा, जर तुमचा मुलगा क्रिकेट खेळू लागला आणि त्याच्याबरोबर अश्या प्रकारे वागणूक केली गेली तर तुम्हाला कसं वाटेल? तो 23 वर्षाचा मुलगा आहे, 33 नाही. माझ्यावर टीका करा, मी त्याला सहन करू शकतो, पण 23 वर्षाच्या मुलाबरोबर हे वागणं मान्य नाही.
क्रिस श्रीकांत यांनी टीम इंडियाच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले होते, आपण अनेक चांगले कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश करत नाही, पण जे खेळाडू चांगले नाहीत त्यांना टीममध्ये सामील केले जाते. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे हर्षित राणा, जो गंभीरच्या जवळ राहतो म्हणून टीममध्ये आहे.
Comments are closed.