पंढरपूर कॉरिडॉरच्या प्रकल्पावरून महायुतीत घमासान? अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?

पंढरपूर कॉरिडॉर: राज्यातील महायुती सरकारच्या प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर (Pandharpur Corridor) विकास प्रकल्पावरून सरकारमधील घटक पक्षांमध्येच मतभेदाची ठिणगी पडतांना दिसतीये. सरकारच्या प्रस्तावित ‘पंढरपूर कॉरिडॉर विकास प्रकल्पा’ला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. ‘पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प’ करतांना होळकर वाडा, शिंदे सरकार वाडा, नामदेव पायरी यांसह अनेक मंदिरांना पाडावे लागणारेय. ही गोष्ट वारकऱ्यांच्या आस्थेची असल्याने आपला त्याला विरोध असल्याचं मिटकरी म्हणालेय. काशी, उज्जैन आणि वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याचा सरकारचं धोरण आहेय. मात्र, पंढरपूर या देवस्थानांपेक्षा सर्वार्थाने वेगळे असल्याने तेथील विकासाची तुलना पंढरपूरशी करता येणार नसल्याचं मिटकरी म्हणालेय.

पंढरपुरातील ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंना हात न लागता विकास होणार असेल तर आपली त्याला हरकत नसेल. मात्र, पंढरपुरातील वारकऱ्यांची आस्था असलेल्या इंचभर दगडालाही हात लागला तर आम्ही ते सहन करणार नाहीय, असा इशारा यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी दिलाय.‌

अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?

पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प’ करतांना होळकर वाडा, शिंदे सरकार वाडा, नामदेव पायरी यांसह अनेक मंदिरांना पाडावे लागणारेय. ही गोष्ट वारकऱ्यांच्या आस्थेची असल्याने आपला त्याला विरोध आहे. काशी, उज्जैन आणि वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याचा सरकारचं धोरण आहे. मात्र, पंढरपूर या देवस्थानांपेक्षा सर्वार्थाने वेगळे असल्याने तेथील विकासाची तुलना पंढरपूरशी करता येणार नाही. पंढरपुरातील ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंना हात न लागता विकास होणार असेल तर आपली त्याला हरकत नसेल. मात्र, पंढरपुरातील वारकऱ्यांची आस्था असलेल्या इंचभर दगडालाही हात लागला तर आम्ही ते सहन करणार नाही, असा  इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत नेमकं काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे दार चांदीने मढविण्याचे काम सुरू

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता. दरम्यान नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्यावतीने सदर दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे. यासाठी तीस किलो चांदी लागणार असून याची किंमत जवळपास तीस लाख रूपये आहे. शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व. जनाबाई यांच्या स्मरणार्थ हा दरवाजा चांदीचा केला आहे. अरगुलकर परिवार श्री विठ्ठल रूक्मिणीचे निस्सीम भक्त आहेत. त्यानुसार मागील आठ दिवसापासून सदर काम सुरू आहे. यामुळे येथून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात सदर काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराला मोठी झळाळी मिळणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.