आयपीएलच्या नावावरून वाद! बीसीसीआयवर लावले गंभीर आरोप, केरळच्या उच्च न्यायालयाने केला हस्तक्षेप

काही दिवसांतच ‘इंडियन प्रीमियर लीग’चा (आयपीएल) नवीन हंगाम सुरू होत आहे. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळांवर (बीसीसीआय) एकाने आरोप केले आहेत. ‘इंडियन प्रीमियर लीग’ हे नाव बेकायदेशीर वापरल्याचा दावा करणारी जनहित याचिका केरळच्या उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

आशिक करोत नावाच्या एका स्वयंघोषित सामाजित कार्यकर्त्याने ही याचिका दाखल केली होती. बीसीसीआय ‘इंडियन प्रीमियर लीग’ हे नाव वापरू शकत नाही, असे दावा त्याने केला. त्याचा हा दावा सरन्यायाधीश सौमेन सेन आणि न्यायमूर्ती श्याम कुमार व्हीएम यांच्या खंडपीठाने फेटाळून लावला आहे. त्यांनी म्हटले, “आम्हाला त्या युक्तिवादामध्ये काही तथ्य आढळले नाही आणि त्यामुळे आम्ही ही याचिका फेटाळली. त्याला जनहित याचिता म्हणून ठेवणे योग्य ठरणार नाही.”

तसेच न्यायालयाने पुढे सांगितले की, या याचिकेला कोणताही ठोस पुरावा नाही. आयपीएल अनेक वर्षांपासून सुरु आहे आणि आता हा मुद्दा उपस्थित करणे अवास्तव आहे.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे बीसीसीआयला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे कोणत्याही कायदेशीर अडथळ्यांशिवाय आयपीएल ही स्पर्धा त्याच नावाने सुरू राहणार. ही लीग जागतिक क्रिकेटमधील एक प्रसिद्ध आणि त्याचे लाखो चाहते असून अशा प्रकारच्या घटनेमुळे त्याच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम झाला असता, मात्र न्यायालयाने वेळेत ती अडचण सोडवली आहे.

१९ व्या आयपीएलचा हंगाम २८ मार्चपासून सुरू होत आहे. यामध्ये पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात होणार आहे. हा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्टेडियमवर सामने खेळण्यास कर्नाटक क्रिकेट असोसिएसन आणि आरसीबी संघाला कर्नाटक राज्य सरकारने परवाणगी दिली आहे.

आयपीएल २०२५ च्या हंगामात आरसीबीच्या विजयानंतर झालेल्या कार्यक्रमामध्ये या स्टेडियमवर चेंगराचेंगरी झाली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामाआधी स्टेडियमवरील सुरक्षा आणि इतर महत्वाच्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतरच संघाला सामने खेळण्याची परवाणगी देण्यात आली.

Comments are closed.