शववाहिका खरेदीत 35 कोटींचा भ्रष्टाचार, बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी

तब्बल 100 शववाहिकांच्या खरेदीत 35 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या शववाहिकांच्या खरेदीसाठी मागवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले असून स्पर्धा टाळण्यासाठी नियमबाह्य निविदेला मंजुरी देऊन बाजारभावापेक्षा अधिक दराने शववाहिका खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

निविदा प्रसिद्ध केल्यानंतर खरेदी कालमर्यादेत किमान तीन निविदाकारांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे निदर्शनास येत असल्यास निविदेस कोणतीही मुदतवाढ न देता निविदाकाराने सादर केलेले तांत्रिक लिफाफे उघडून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करून पुढील कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यानंतर किमान तीन निविदाकार तांत्रिक विश्लेषणात पात्र ठरत असतील तरच त्यांचे व्यावसायिक लिफाफे उघडण्याची प्रक्रिया करायची असते. तसेच सर्व प्रक्रियेअंती जर किमान तीन निविदाकार तांत्रिक विश्लेषणात पात्र ठरले नाहीत तर निविदा प्रक्रिया नव्याने राबवणे गरजेचे असते. या निविदा प्रक्रियेत खरेदी कालमर्यादेत तीन निविदाकारांनी निविदेत सहभाग घेतल्याचे निदर्शनास येत असतानाही निविदा सादर करण्यास नियमबाह्य प्रथम आणि द्वितीय मुदतवाढ देण्यात आली.

मर्जीतल्या निविदाकाराला टाळू

सेल पीरियडमध्ये प्रथम आणि द्वितीय मुदतवाढ देऊनही निविदेत तीनच निविदाकार येऊन त्यात एकच पात्र ठरत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. तसेच आता एकच निविदा मान्य करण्यावाचून पर्याय नाही आणि हरकत नाही असे कागदोपत्री दाखवले. दरम्यान, या संपूर्ण घोटाळय़ाचा सूत्रधार परिवहन विभागाचा तत्कालीन उपसंचालक पैलास कराळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या सर्व प्रक्रियेत हीच व्यक्ती विभागप्रमुख होती. त्यानेच भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे.

Comments are closed.