बांगलादेशात आज फैसला, हिंसाचारात मतदान
बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीत आज 47.91 टक्के मतदान झाले. यावेळी बॉम्बस्पह्टाच्या आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. मतदानानंतर लगेच सायंकाळी मतमोजणीला सुरूवात झाली असून, बांगलादेशात सरकार कोणाचे? बीएनपी की जमात-ए-इस्लामीचे याचा फैसला काही तासांत होणार आहे. बांगलादेशात 2024 मध्ये शेख हसीना यांच्या सरकारविरुद्ध बंड पुकारल्यानंतर 18 महिन्यांपासून राजकीय अस्थिरता आणि हिंसाचार सुरू आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशातून पळ काढला आणि हिंदुस्थानात आश्रय घेतला आहे.
Comments are closed.