देश विदेश – केरळमध्ये जंगली हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
केरळमध्ये जंगली हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
केरळच्या अरलम फार्ममध्ये एका जंगली हत्तीने केलेल्या हल्ल्यात एका 40 वर्षीय आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला आहे. अनीश असे या तरुणाचे नाव असून तो कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. घराबाहेर आलेल्या जंगली हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न अनीशने केला. या वेळी हत्तीने त्याच्यावर हल्ला चढवला. सोंडीने त्याला खाली पाडले व त्यानंतर पायाने तुडवले. गंभीर जखमी झालेल्या अनीशला पेरावूल तालुक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ब्रिटनमध्ये प्रवेशासाठी डिजिटल परवानगी आवश्यक
ब्रिटनने 85 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी लेक्ट्रॉनिक ट्रव्हल ऑथोरायझेशन (ईटीए) बंधनकारक केले आहे. या नियमामुळे आता ब्रिटनचा प्रवास करणाऱया प्रवाशांना वैध ईटीए, ई-व्हिसा आणि अन्य आवश्यक कागदपत्रांशिवाय प्रवाशांना एअरलाईन्स बाेर्डिंगची परवानगी मिळणार नाही. ईटीए हे एक डिजिटल एन्ट्री परमिट आहे, जी परदेशी प्रवाशांसाठी आवश्यक आहे. ही नवीन व्यवस्था जुन्या पासपोर्टवर लागणाऱया कागदी व्हिसा स्टिकरची जागा घेईल. ब्रिटिश आणि आयरिश नागरिक, दुहेरी नागरिकत्व असलेले आणि ब्रिटनमध्ये राहण्याचा अधिकार असलेल्यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.
हैदराबादच्या फ्लॅटमध्ये youtubercha मृतदेह आढळला
तेलंगणातील हैदराबादमध्ये 21 वर्षीय यूटय़ूबर तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. बोनू कोमली असे या यूटय़ूबरचे नाव असून ती आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमची रहिवासी होती. गेल्या 11 महिन्यांपासून ती हैदराबादमध्ये राहून एका खासगी महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत होती. तसेच ती यूटय़ूबवर लाइफस्टाइल आणि पर्सनल व्हिडीओदेखील बनवत होती. मृत्यूच्या काही तास आधी तिने तिच्या आईला ‘आय लव्ह यू मम्मी’ आणि ‘आपल्या धाकटय़ा भावाची काळजी घे’, असा मेसेज पाठवला होता. मेसेजनंतर काही वेळाने तिचा पह्न बंद झाला. त्यानंतर कोमली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
अमेरिकेचा निवृत्त पायलट निघाला चीनचा गुप्तहेर
अमेरिकेतील वायुदलातील माजी एलीट फायटर पायलट आणि एफ-35 प्रशिक्षक गेराल्ड एडी ब्राऊन ज्युनिअरला अटक करण्यात आली. चिनी सैन्य पायलटला गुप्तपणे लढाऊ प्रशिक्षण दिल्याचा या पायलटवर आरोप आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी सहायक अॅटॉर्नी जनरल जॉन ए आयजेनबर्गने म्हटले की, अमेरिकी वायुदलाने मेजर ब्राऊनला एका विशिष्ट लढाऊ पायलटच्या रूपात प्रशिक्षित केले होते. राष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली होती. परंतु त्यांनी चीनचा गुप्तहेर म्हणून काम केले आहे. एफ-4, एफ-15, एफ-16, ए-10 आणि एफ-35 सारख्या विमानावर लढाऊ पायलट प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले होते.
कॅनडाचे पंतप्रधान 4 दिवसांच्या हिंदुस्थान दौऱ्यावर
कॅनडाचे पंतप्रधान मार्प कार्नी आजपासून चार दिवसांच्या हिंदुस्थान दौऱ्यावर आले आहेत. मार्क कार्नी यांचा हा पहिला भारत दौरा आहे. कॅनडामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्नी मुंबईतील व्यावसायिक नेत्यांची भेट घेतील. या वेळी पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत उत्पादन यांमध्ये गुंतवणुकीवर चर्चा होईल.
कार्नी 1 मार्च रोजी नवी दिल्लीत पोहोचतील आणि 2 मार्च रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील. कार्नी यांचा हा दौरा 7 मार्चपर्यंत राहील. या दौऱ्याचा उद्देश कॅनडाचे अमेरिकेवरील आर्थिक अवलंबित्व कमी करणे आणि नवीन व्यापारी मार्ग खुले करणे हा आहे.
Comments are closed.