कासवाची भाजी शिजवताना दाम्पत्याला रंगेहात अटक, वन विभागाची कारवाई
इरई धरण परिसरात वन्यजीवांची शिकार करून त्याचे मांस शिजवून खात असलेल्या वन दाम्पत्याला विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योती शैलेश घंटसाल (35) व त्यांचे पती शैलेश नोमनाद्री घंटसाल (38) असे अटकेतील आरोपींचे नाव असून ते आंध्रप्रदेशातील रहिवासी आहे. वन्यजीवाची शिकार करून मास शिजवित असल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरी धाड टाकली. यावेळी ज्योती घंटसाल व तिचा पती शैलेश घंटसाल हे फ्लॅप शेल टर्टल या संरक्षित कासवाला पकडून त्याची भाजी शिजवून खात असताना आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी केली.
Comments are closed.