वडीलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची संशयित आरोपी दुर्वास पाटीलला मुभा

भक्ती मयेकर खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी दुर्वास पाटील याला न्यायालयाने त्याचे वडिल दर्शन पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची बुधवारी मुभा दिली.
दर्शन पाटील हा वीर खून प्रकरणातील संशयित होता. न्यायालयीन कोठडीत असताना त्याची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर आधी जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतू अधिक उपचारांसाठी त्याला मुंबईतील जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी न्यायालयाने मुलगा दुर्वास पाटीलला बुधवारी उपस्थित राहण्याची मुभा दिली.
दरम्यान, संशयित दुर्वास पाटीच्या वकिलांनी न्यायालयात दर्शन पाटीलचे सर्व दिवस-वार करण्यासाठी न्यायालयात 15 दिवसांच्या जामिनाची मागणी केली आहे. त्याविरोधात सरकारी पक्षातर्फे जोरदार युक्तिवाद करण्यात आला. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत न्यायालयात सुनावणी सुरु होती.
Comments are closed.