काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे

बलात्कार प्रकरणी मिळाला अंतरिम जामीन

तिरुअनंतपुरम : केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी पलक्कडचे काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल यांना बलात्कार आणि बळजबरीने गर्भपात करविल्याप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी तिरुअनंतपुरम सत्र न्यायालयाने ममकूटाथिल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यास नकार दिला होता. राहुल ममकूटाथिल यांच विरोधात लैंगिक शोषणाचे एकूण तीन गुन्हे नोंद आहेत. आमदाराला यापूर्वी तीनपैकी दोन प्रकरणांमध्ये अटकेपासून दिलासा मिळाला होता. तर तिसऱ्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी आमदाराला तुरुंगात रहावे लागले आहे. कोट्टायम जिल्ह्यातील एका महिलेच्या तक्रारीच्या आधारावर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पूर्वीच्या लैंगिक शोषणाच्या दोन प्रकरणांमध्ये आमदाराला अटकेपासून दिलासा मिळाला होता. ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळ्या महिलांच्या तक्रारीच्या आधारावर नोंदविण्यात आली होती.

Comments are closed.