Court stays investigation officer’s work in Somnath Suryavanshi death case


मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सुर्यवंशीच्या आईने राज्य सरकार विरोधात दाखल केलेल्या याचिकेची आज (29 एप्रिल) दुसरी सुनावणी पार पडली. न्यायालयात झालेल्या महत्त्वाच्या सुनावणीत शासनाने नेमलेल्या तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. यावेळी तपास अधिकाऱ्याच्या कामकाजावर न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सुर्यवंशीच्या आईने राज्य सरकार विरोधात दाखल केलेल्या याचिकेची आज (29 एप्रिल) दुसरी सुनावणी पार पडली. न्यायालयात झालेल्या महत्त्वाच्या सुनावणीत शासनाने नेमलेल्या तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. यावेळी तपास अधिकाऱ्याच्या कामकाजावर न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. (Court stays investigation officer’s work in Somnath Suryavanshi death case)

संबंधित तपास अधिकाऱ्याने 28 आरोपींना नोटीस बजावून चौकशीत त्यांनी काय बोलले पाहिजे? हे नमूद केल्याची बाब ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि ही निष्पक्ष चौकशी नसल्याचे मांडले. तसेच चौकशी प्रक्रियेत निष्पक्षतेचा अभाव असून, ती दबावाखाली केली जात असल्याची बाब प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाने प्रकाश आंबेडकर यांची मागणी मान्य करत, संबंधित तपास अधिकाऱ्याच्या कामावर स्थगिती (Stay) दिली आहे. तसेच, त्यांनी कोणताही निर्णय घेऊ नये वा कोणताही चौकशी अहवाल सादर करू नये, असा स्पष्ट आदेश कोर्टाने दिला आहे. याशिवाय एयआयटी स्थापन करण्याबाबत निर्णय, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर काय निर्णय घ्यावा? याबाबत कायद्यात अस्पष्टता आहे. याविषयी देखील पुढील सुनावणीला चर्चा होणार असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – NCERT Syllabus : एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातून मुघल इतिहास वगळला; वंशजाची भाजपा सरकारवर आगपाखड

न्यायालयाने सरकारने नियुक्त केलेल्या चौकशीला स्थगिती दिली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला की, ही चौकशी फॉरेन्सिक पोस्टमार्टम अहवालाच्या विरोधी दिशेने चालली आहे. तसेच सरकारने नियुक्त केलेली चौकशी सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेला मृत्यू श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे झाल्याच्या दिशेने नेली जात होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकर चौकशीतील दिशाभूल व पूर्वग्रहदूषित तपास न्यायालयाच्या लक्षात आणून दिला. या प्रकरणी पुढील सूनवाई 8 मे 2025 होणार आहे.

सोमनाथ सूर्यवंशी यांची आई काय म्हणाली?

माध्यमांशी संवाद साधताना विजयाबाई सूर्यवंशी म्हणाल्या की, आम्हाला न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी लढत आहेत. त्यांच्यावरच आमचा विश्वास आहे. मला कायद्यातील काही कळत नसले तरी बाळासाहेब आंबेडकर यांना सर्व कळतं आणि ते जे करत आहेत, ते योग्यच आहे, असा विश्वास विजयाबाई सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Gowari Society : गोवारी समाज आता विकासाच्या प्रवाहात; डॉ. परिणय फुकेंच्या प्रयत्नांना यश


Edited By Rohit Patil



Source link

Comments are closed.