जालन्यात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणारे दोन कंटेनर गोरक्षकांनी पकडले, 40 ते 50 जनावरांची सुटका

जालन्यात गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन कंटेनर गोरक्षकांनी पकडले असून या कारवाईत सुमारे 40 ते 50 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे. मध्यरात्रीच्यावेळी जालना तालुक्यातील इंदेवाडी आणि इस्लामवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.
सिल्लोडहून उदगीरकडे दोन वेगवेगळ्या कंटेनरमधून अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार गोरक्षकांनी इस्लामवाडी येथे जनावरांनी भरलेला एक कंटेनर पकडला. तर इंदेवाडी येथे काही स्थानिकांनी गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा दुसरा कंटेनर अडवून याची माहिती गोरक्षकांना दिली. यावेळी काही स्थानिकांनी कंटेनरच्या काचांवर दगडफेक करत काचा फोडल्या. दरम्यान, गोरक्षकांनी एक कंटेनर ताब्यात घेऊन तालुका जालना पोलीस ठाण्यात आणले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
इस्लामवाडी येथे गोरक्षकांनी दुसरा कंटेनर भरून ठेवला होता याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर ताब्यात घेऊन तालुका पोलीस ठाण्यात आणले. दोन कंटेनरमध्ये दाटीवाटीने जनावरं कोंबल्याचं आढळून आलं. यामध्ये चार जनावरांच्या मृत्यू झाला. या प्रकरणात जालना तालुका पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले या प्रकरणातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जालना तालुका पोलीस करीत आहे.
या कारवाईत अवैध वाहतुक केल्या जाणाऱ्या 40 ते 50 जनावरांची सुटका करून त्यांना गोशाळेत सोडण्यात आले आहे. यावेळी गोरक्षक दलाचे राहुल वर्तले, रोहित जाधव, व्यंकटेश भगत, देवेंद्र सतीकर, विशाल वाघमारे, साहिल लखलव, वंश यादव, केतन नखलव, अजिंक्य शिंदे, सागर पोटपत्रेवार, प्रदीप चौधरी, गोलु सतिकर, निखिल नखलव,आकाश देसार, कार्तिक चौधरी यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.