कसोटी क्रिकेटबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओचे वादग्रस्त विधान! म्हणाला, “प्रत्येक देशाला कसोटी खेळण्याची गरज…”

टॉड ग्रीनबर्ग वादग्रस्त विधान: सध्याच्या काळात जागतिक क्रिकेटमध्ये जर एखाद्या फॉरमॅटच्या भविष्याबद्दल सर्वाधिक चर्चा होत असेल, तर तो कसोटी क्रिकेट आहे. (Future of Test cricket) कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवातही केली आहे, ज्याचे आतापर्यंत 3 हंगाम खेळले गेले आहेत. मात्र, आता कसोटी क्रिकेटच्या भविष्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे विद्यमान सीईओ टॉड ग्रीनबर्ग यांचे एक मोठे आणि वादग्रस्त विधान समोर आले आहे, ज्यात त्यांनी सर्व देशांना हा फॉरमॅट न खेळण्याचा सल्ला दिला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग यांनी आपल्या विधानात म्हटले आहे की, “मला वाटत नाही की कसोटी खेळणाऱ्या देशांची कोणतीही निश्चित संख्या असावी. पण भविष्यात कसोटी क्रिकेटची संख्या कमी होणे हे आपल्यासाठी नुकसानकारक नसून फायदेशीर ठरेल, असे मला वाटते. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, मला वाटत नाही की जागतिक क्रिकेटमधील प्रत्येक देशाला कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा बाळगण्याची गरज आहे. यात काहीच अडचण नाही. कसोटी क्रिकेटला आवडणाऱ्या अनेक लोकांना माझे हे विधान कदाचित आवडणार नाही, पण जर आपण काही देशांना जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, त्यांना कसोटी क्रिकेट खेळण्यास भाग पाडले, तर खरंच आपण त्या देशांना दिवाळखोर करण्याचा प्रयत्न करत असू.” (Cricket Australia CEO statement)

2025च्या शेवटी ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली ॲशेस मालिका खेळली जाणार आहे. (Ashes series 2025) ज्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड व्यतिरिक्त जागतिक क्रिकेटमधील बहुतांश चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे, टॉड ग्रीनबर्ग यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा एकीकडे इंग्लंड आणि भारत यांच्यात रोमांचक कसोटी मालिका नुकतीच संपली आहे (England vs India Test series), तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेत एकतर्फी पराभूत केले आणि न्यूझीलंडनेही झिम्बाब्वेविरुद्ध मालिका सहज जिंकली.

Comments are closed.