जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर; जैस्वाललाही वगळले, पाहा टीम इंडियाचा संपूर्ण संघ

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) थरार यावेळी पाकिस्तान आणि युएईमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे.

टीम इंडियाचे सर्व सामने यूएईमध्ये होतील. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे खेळवले जातील. मात्र त्याआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे.

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळता येणार नाहीय.

बीसीसीआयने एक पत्रक काढत जसप्रीत बुमराहबाबत माहिती दिली. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात काही बदलही केले आहेत.

बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

खरंतर, आधी यशस्वी जैस्वालचे नाव 15 सदस्यीय संघात होते. मात्र आता त्यातून जैस्वालचे नाव काढून वरुण चक्रवर्तीला भारतीय संघाच्या 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे.

यशस्वी जैस्वालसह मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेले होते. त्यामुळे त्या कसोटी सामन्यातही त्याला खेळता आले नव्हते. पण त्यानंतर बुमराहची वैद्यकीय चाचणी झाली होती आणि त्याच्यावर उपचार सुरु झाले होते. त्यानंतर बीसीसीआयने जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नसल्याचे जाहीर केले.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ (Team India Squads Champions Trophy 2025)-  रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती

येथे प्रकाशित: 12 फेब्रुवारी 2025 07:06 एएम (आयएसटी)

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..

Comments are closed.