टीम इंडियाच्या स्टार गोलंदाज ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा? हातात हात धरल्याचा फोटो Viral
अर्शदीप सिंग माजी पंजाबी अभिनेत्री समरीन कौर: सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) मैदानात मोठी चुरस रंगल्याचं पाहायला मिळतंय. पण, एकीकडे हा रणसंग्राम सुरू असला, तरीसुद्धा याच सीझनमध्ये (IPL 2026 Season 19) खेळणारा एक धडाकेबाज खेळाडू त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आम्ही ज्या खेळाडूबाबत बोलतोय तो खेळाडू म्हणजे, पंजाब किंग्सचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh). टीम इंडियाचा (Team India) हा स्टार गोलंदाज त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अचानक चर्चेत आला आणि त्यासाठी कारण ठरला, त्यानंच पोस्ट केलेला एक फोटो. नुकताच अर्शदीपनं आपल्या स्नॅपचॅटवर एक फोटो शेअर (Viral Snapchat Post) केलेला, ज्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधाण आलं.
अर्शदीप सिंहनं त्याच्या स्नॅपचॅटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यानं कुणा एका मुलीचा हात धरलेला. या फोटोमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यामुळे सस्पेन्स अधिकच वाढला. आता नेटकरी कसून अर्शदीपनं जिचा हात धरलेला, त्या मिस्ट्री गर्लचा शोध घेऊ लागलेत. मग फोटोतले अगदी लहान सहान बारकावे पाहू लागले. मग, जे अर्शदीपच्या लक्षात आलं नाही, नेमकं तेच नेटकऱ्यांनी हेरलं, ते म्हणजे, हातावरचा टॅटू.
हातावरील टॅटूवरून अर्शदीपच्या लेडी लव्हची ओळख पटली? (Arshdeep Singh Lady Love?)
मीडिया रिपोर्टनुसार, अर्शदीपच्या फोटोमध्ये दिसणाऱ्या तरुणीच्या हातावरील टॅटू हा समरीन कौरच्या टॅटूशी तंतोतंत जुळतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर, अर्शदीप आणि समरीन यांच्यात वाढत असलेल्या जवळीकीबाबत चाहते आपापले तर्क-वितर्क मांडत आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अर्शदीप सिंहनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, तसेच समरीन कौरकडूनही कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. तूर्तास, या केवळ चर्चाच आहेत. त्यामुळे अर्शदीपला खरंच त्याच्या आयुष्यातली लेडी लव्ह भेटलीय का? या चर्चाही सुरूच आहेत.
🚨 अफवांचा इशारा 🚨
अर्शदीप सिंगने स्नॅपचॅटवर दोन कथा पोस्ट केल्या ज्यात तो एका मुलीचा हात धरलेला दिसतो.
समरीन कौर, जी आशिष चंचलानीचीही माजी आहे, तिच्याशी जुळणारा “f” टॅटू चाहत्यांच्या लक्षात आला.
अर्शदीप समरीन कौरला डेट करत आहे का? 👀 pic.twitter.com/dEGw3Gkq1t
— क्रिकेटचा उल्लेख करा (@MentionCricket) 5 एप्रिल 2026
अर्शदीपची महिला समरीन कौरवर प्रेम करते? (समरीन कौर कोण आहे?)
मीडिया रिपोर्टनुसार, अर्शदीप सिंहनं स्नॅपमध्ये जिचा हात धरलेला, ती दुसरी-तिसरी कुणी नसून त्याची लेडी लव्ह पंजाबी मॉडेल समरीन कौर (Samreen Kaur) आहे. मुळची जम्मू-काश्मीरची रहिवाशी असलेली समरीन 2018 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेची फायनलिस्ट होती. तसेच, तिनं पंजाबी आणि हिंदी म्युझिक इंडस्ट्रीतही काम केलंय. तिनं Jubin Nautiyal याच्या ‘तुझे भूलना तो चाहा’ आणि बादशाहच्या (Badshah) ‘बावला’ सारख्या लोकप्रिय गाण्यांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडलीय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.