आपले विद्यार्थी हेच आपले भविष्य, त्यांच्या स्वप्नांचे रक्षण करा! इरफान पठाणचाही आंदोलनाला पाठिंबा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नीट परीक्षा घोटाळयाला जबाबदार असलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लाखो तरूण रस्त्यावर उतरले आहे. यादरम्यान पोलिसांनी केलेल्या अमानूष लाठीचार्जला सामोरे जाऊन सरकारच्या अन्यायाविरोधात अजूनही आवाज उठवत आहेत. जेनझींच्या या आंदोलनाला विरोधक, कलाकारांसह क्रिकेटपटूंनीही पाठिंबा दिला आहे. माजी क्रिकेटपटू इरफान पठाणा याने देखील आपलं मत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

इरफान पठाणने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने म्हटले की आपल्या चांगल्या भविष्यासाठी प्रत्येक विद्यार्थी अनेक वर्षे कठोर परिश्रम घेतो आणि या प्रवासात त्यांचे कुटुंबीयही अनेक गोष्टींचा त्याग करतात. त्यामुळे या पेपरफुटीसारख्या प्रकरणांमुळे त्यांची ही आशा हिरावली जाऊ नये, असे त्यांने म्हटले आहे.

मला पूर्ण विश्वास आहे की आपला देश प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळेल याची खबरदारी घेतील. तसेच, अशी घटना पुन्हा कधीही घडू नये यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी आशा
इरफान पठाणने पोस्टद्वारे व्यक्त केली.

आपले विद्यार्थी हेच आपले भविष्य आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचे रक्षण करा, असा महत्त्वाचा सल्ला इरफानने सोशल मीडियाद्वारे दिला आहे.

CJP चे आंदोलन सुरुच राहणार

पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 26 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. हे उपोषण आता त्यांनी मागे घेतले आहे. वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहणार आहे.

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं; CJP चे आंदोलन सुरुच राहणार, दिल्लीत मध्यरात्री मोठ्या घडामोडी

Comments are closed.