शिवम दुबेने मुंबई खरेदी केले 27 कोटींचे फ्लॅट

भारतीय क्रिकेटपटू शिवम दुबेने मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे ओशिवरामध्ये दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. हे दोन्ही फ्लॅट डीएलएच एन्क्लेवमध्ये असून यासाठी दुबेने 27.50 कोटी रुपये मोजले आहेत. या दोन्ही फ्लॅटचा एरिया 9603 वर्ग फूट इतका आहे. तसेच यात तीन कार पार्ंकगचा समावेश आहे. या फ्लॅट खरेदीसाठी दुबेने 1.65 कोटी रुपयांचे स्टॅम्प शुल्क आणि 30 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क मोजले आहे. सध्या अंधेरीतील फ्लॅटला जोरदार मागणी वाढली असून बिझनेसमॅन, बॉलीवूड आणि क्रिकेटपटू मोठय़ा प्रमाणात फ्लॅट खरेदी करत आहेत.
Comments are closed.