गुन्हा : अकरावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विवाहितेला अटक.

pc: फ्री प्रेस जर्नल

चेन्नई: विनोदिनी या २८ वर्षीय विवाहित महिलेला तिरुवल्लूर जिल्ह्यात १७ वर्षीय मुलाचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

अकरावीचा विद्यार्थी असलेला हा मुलगा शनिवारी बेपत्ता झाला, त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तपासात या मुलाशी ओळख असलेल्या विनोदिनीने त्याला तिच्या नातेवाईकाच्या घरी नेल्याचे समोर आले आहे.

दोन मुलांची आई असलेल्या विनोदिनीवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

ही घटना गेल्या वर्षी घडलेल्या अशाच एका प्रकरणासारखीच आहे, ज्यात सत्यप्रिया नावाच्या महिलेला तिच्या मुलाचा मित्र असलेल्या १७ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Comments are closed.