वसईत देहविक्रीच्या रॅकेटमधील 12 वर्षांच्या मुलीची सुटका, 200 पेक्षा जास्त पुरुषांनी शरीराचे लचक
गुन्हेगारीच्या बातम्या: वसईतील नायगाव येथे 26 जुलै रोजी उघडकीस आलेल्या देह व्यापार रॅकेटमधून 12 वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली होती. या अल्पवयीन पीडितेने एनजीओना दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. केवळ तीन महिन्यांत 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित मुलीने म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन यांच्या मदतीने 26 जुलै रोजी संयुक्त मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी नायगाव (पूर्व) येथील एका इमारतीत छापा टाकण्यात आला होता. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना आढळले की, बांगलादेशातील एका 12 मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी तिची यशस्वीरित्या सुटका केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
200 पेक्षा जास्त पुरुषांनी शरीराचे लचके तोडले
हार्मोनी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अब्राहम मथाई यांनी सांगितले की, “मुलीला प्रथम गुजरातमधील नाडियाद येथे नेण्यात आले होते आणि तीन महिन्यांच्या कालावधीत 200 हून अधिक पुरुषांकडून लैंगिक शोषण झाले. ती अद्याप किशोरावस्थेत पोहोचलेली नाही, तरीही देह व्यापारातील राक्षसांनी तिचे बालपण हिरावून घेतले.” तपासात उघड झाले की, शाळेत एका विषयात नापास झाल्यानंतर पालकांच्या भीतीने मुलगी ओळखीच्या एका महिलेसोबत घरातून पळाली होती. मात्र त्या महिलेने तिला भारतात आणून देह व्यापारात ढकलले होते. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी मथाई यांनी केली आहे.
आमिष दाखवून भारतात आणले
दरम्यान, हार्मनी फाउंडेशनने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, शालेय परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर, अल्पवयीन मुलीला तिच्या गावातील एका महिलेने आमिष दाखवून तिला पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे बेकायदेशीरपणे आणले आणि तिची बनावट कागदपत्रे बनवली होती. त्यानंतर तिला मुंबईला नेण्यात आले, जिथे तिला नायगावमध्ये बंदिवान बनवण्यात आले. “नायगावमध्ये ती एका वृद्ध पुरूष आणि त्याच्या पत्नीसह 7 ते 8 मुलींसोबत राहिली होती. त्या पुरूषाने तिला इंजेक्शन दिले आणि तिच्यावर अत्याचार केला आणि तेव्हापासून तिला तिच्या संमतीशिवाय अनेक अज्ञात ग्राहकांना ऑफर करण्यात आली,” असे निवेदनात म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.