छ. संभाजीनगरमध्ये वैयक्तिक वादातून तरूणाला संपवण्याचा प्रयत्न; एकाच कुटुंबातील सदस्यांनी मध्यरा


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वैयक्तिक वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांनी परिसरातीलच तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची (Crime News) धक्कादायक घटना घडली आहे. नागसेननगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजता हा प्रकार घडला असून, अक्षय शिरसाट (वय २८) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शिरसाट हा नागसेननगरमध्येच राहतो. शुक्रवारी रात्री तो आपल्या मित्रांसोबत गाढे चौकात मित्रासोबत गप्पा मारून घरी परतत होता. त्याच वेळी वैयक्तिक वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांनी त्याला रस्त्यावर अडवून शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला (Crime News) केला. हल्ल्यादरम्यान आरोपींनी अक्षयला जमिनीवर आपटून, त्याच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने वार केले.(Chhatrapati Sambhajinagar)

Chhatrapati Sambhajinagar Crime News: मध्यरात्री सुमारे १२ वाजता घडली घटना

नागसेननगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजता हा प्रकार घडला, अक्षय रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत अक्षयला घाटी रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर उशिरापर्यंत शस्त्रक्रिया सुरू होती. डॉक्टरांनी त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. घटनेनंतर पोलिस निरीक्षक अतुल येरमे आणि संग्राम ताटे यांनी घटनास्थळी धाव घेत मोठा फौजफाटा तैनात केला. जमावाला पांगवून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून, नागसेननगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Chhatrapati Sambhajinagar)

Chhatrapati Sambhajinagar Crime News: शिवीगाळ करत थेट जिवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास नागसेननगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. अक्षय शिरसाट (वय अंदाजे २८) हा नागसेननगरमध्येच राहतो. शुक्रवारी रात्री अक्षय गाढे चौकात मित्रांसोबत बोलत थांबला होता. काही वेळात तो पायी नागसेननगरमध्ये जाताच वैयक्तिक वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांनी त्याला रस्त्यावर अडवलं. शिवीगाळ करत थेट जिवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर हल्ला चढवला. डोके थेट जमिनीवर आपटल्याने अक्षय रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला. मात्र, तरीही हल्लेखोर कुटुंबाने त्याच्यावर चाकूने, रॉडने हल्ला सुरूच ठेवला होता. स्थानिकांची गर्दी वाढण्यास सुरुवात होताच हल्लेखोर पसार झाले. स्थानिक व कुटुंबाने गंभीर जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेल्या अक्षयला घाटी रुग्णालयात दाखल केले. घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

आणखी वाचा

Comments are closed.