दुपारी मोठ्या भावाला दिली धमकी, संध्याकाळी लहान भावाला संपवलं; भाजप नेत्याच्या पुतण्याच्या हत्य


लखनौ: मुरादाबादमधील कटघर परिसरातील छोटा छता भागात दिवाळीच्या उत्साहात एक दुर्दैवी घटना घडली त्यामुळे परिसरात शांतता पसरली आहे. बारावीमध्ये शिकणाऱ्या १७ वर्षीय ठाकूर विनायक सिंग या विद्यार्थ्याचा शेजाऱ्यांनी चाकूने भोसकून खून केल्याची (Crime News) धक्कादायक घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. विनायकने घराबाहेर होणाऱ्या शिवीगाळीला विरोध केला होता, याच कारणावरून त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.(BJP Leader Nephew Murder Case)

विनायकला कारणाविना शिवीगाळ

मृत विद्यार्थी विनायक सिंग हा पवन कुमार सिंग यांचा मुलगा असून, उप-जगन्नाथ सिंह सरस्वती शिशु मंदिरात बारावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याचे काका अनुराग सिंग हे भाजपचे माजी प्रादेशिक मीडिया प्रभारी आहेत. घटनेच्या वेळी विनायक घराबाहेर उभा असताना, शेजारी मनोज शर्मा यांचा मुलगा फुले कौशिक हा दारूच्या नशेत आला आणि विनायकला कारणाविना शिवीगाळ करू लागला.

फुले कौशिकने चाकूने विनायकच्या पोटात वार केला…

विनायकने त्याला विरोध करत निघून जाण्यास सांगितले, त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. थोड्याच वेळात फुलेचा भाऊ आनंद कौशिक, वडील मनोज शर्मा आणि काका अनिल कौशिक हेही तिथे आले. तिघांनी मिळून विनायकवर हल्ला केला. हल्ल्यादरम्यान फुले कौशिकने चाकूने विनायकच्या पोटात वार केला, ज्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. विनायकचे कुटुंबीय बाहेर धावत आले, परंतु तेवढ्यात आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. जखमी अवस्थेत विनायकला कॉसमॉस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून सर्व आरोपींचा शोध सुरु केला आहे. मुरादाबाद पोलिसांच्या पथकांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “हत्येतील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणालाही सोडलं जाणार नाही.” दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या हत्येचा निषेध व्यक्त करत पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

आधी मोठ्या भावालाही जीवे मारण्याची धमकी

घटनेपूर्वीही फुले कौशिक याने परिसरात दुपारी गोंधळ घातला होता. दुचाकीच्या धडकेच्या वादातून त्याने विनायकच्या मोठ्या भावाला अभिषेक सिंग यालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. संध्याकाळी तो पुन्हा दारूच्या नशेत आला आणि वाद वाढत जाऊन हत्येपर्यंत पोहोचला. मृत विनायकच्या कुटुंबात वडील पवन सिंग, आई नीलम सिंग, भाऊ अभिषेक आणि बहीण आयुषी सिंग आहेत. दिवाळीच्या दिवशी विनायकने आपल्या भावासोबत आणि काकांसोबत फटाके फोडले होते. मंगळवारी संध्याकाळी तो पुन्हा फटाके पेटवण्यासाठीच बाहेर गेला होता, परंतु काही मिनिटांतच त्याचा आनंदावर विरजण पडलं. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.