मावस भावाशी सोयरीक, मुलीचा लग्नाला नकार; संतापलेल्या पित्याने लेकीचा घेतला जीव, मनस्तापानंतर गळ

हिंगोली : मस्तानशहानगरात बाप आणि लेकीचा मृतदेह (Hingoli Crime News) आढळून आल्याची घटना 20 ऑगस्टला पहाटे उघडकीस आली. मस्तानशहानगरात सय्यद शाकेर सय्यद जाफर (45) हे राहतात. बुधवारी पहाटे त्यांच्या पत्नीला ते गळफास (Hingoli Crime News) घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आले, तसेच बाजूला मुलगी सय्यद मंतशा सय्यद शाकेर (वय 17) हिचा मृतदेह आढळून आला. यावेळी पोलिसांनी पाहणी केली असता, सय्यद शाकेर यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. बाजूलाच मुलगी मंतशा यांचाही मृतदेह आढळून आला. या घटनेनं शहरात खळबळ उडाली होती, त्यानंतर आता याबाबतची माहिती समोर आली आहे. मुलीने मावस भावाशी लग्नाला विरोध केल्याने संतापलेल्या पित्याने आपल्या मुलीचा जीव घेतला, त्यानंतर झालेल्या मनस्तापानं पित्यानेही घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील मस्तानशाहनगर भागात वडिलांनी पोटाच्या मुलीचा उशिने तोंड दाबून ठार मारले असून यात झालेल्या मनस्तापातून आरोपी पित्याने स्वतःच्या छातीवर चाकूने वार केला आणि हाताची नस कापून घेतली, त्यानंतरही जीव जात नसल्याने स्वतः गळफास घेत आत्महत्या (Hingoli Crime News) केली आहे.

हिंगोली शहरातील मस्तानशहानगर भागामध्ये रहिवासी असलेल्या सय्यद साकेर या आरोपीच्या मुलीची तिच्या मावशीच्या मुलासोबत सोयरीक झाली होती, परंतु मुलगा आवडत नसल्याने मुलीने या लग्नाला विरोध केला होता. त्यामुळे आरोपी वडील सय्यद साकेर याने मुलीच्या तोंडावर उशी ठेवून तिचा खून केला आहे. या घटनेचा मनस्ताप होऊन त्याने स्वतःच्या छातीवर चाकूने वार करून घेत हाताची नस कापून घेतली, तरी देखील स्वतःचा जीव जात नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.(Hingoli Crime News)

आणखी वाचा

Comments are closed.