दारू पार्टीत काकाकडून शिवीगाळ; रागावल्यामुळे पुतण्याने काकाचं भिंतीवर डोकं आपटलं; मग घाबरत वीट

गाझियाबाद: गाझियाबादमधील स्वच्छता कामगार राकेशच्या हत्येचा खुलासा करत पोलिसांनी त्याचा पुतण्या उमेश उर्फ ​​अर्जुनला अटक केली आहे. दारू पार्टी दरम्यान झालेल्या शिवीगाळीचा राग आल्यानंतर त्याने नात्याने काका असलेल्या राकेशची विटेने वार करून हत्या केल्याचे आरोपीने सांगितले. १० ऑगस्ट रोजी गाझियाबादच्या नगर कोतवाली भागात स्वच्छता कर्मचारी राकेशची त्याच्या पुतण्याने हत्या केली होती. पोलिसांनी शुक्रवारी हत्येचा गुन्हा उलगडला आणि आरोपीला अटक केली.

काका राकेशने शिवीगाळ केल्यामुळे चिडून…

नगर कोतवाली परिसरातील १० ऑगस्ट रोजी  राकेशची हत्या त्याच्या भाच्यानेच केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी उमेश उर्फ अर्जुनला अटक केली आहे. चौकशीत आरोपीने कबुली दिली की दारू पार्टीदरम्यान काका राकेशने शिवीगाळ केल्यामुळे चिडून ही हत्या केली. एसीपी कोतवाली रितेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काका राकेश मूळचा अमेठी जिल्ह्यातील संभावा पुरे इंदई गावचा रहिवासी होता. तो गाझियाबादमधील दिल्लीगेट परिसरातील देवी मंदिराजवळील खोलीत भाड्याने राहत होता. त्याचा भाचा उमेश उर्फ अर्जुनदेखील त्याच भागात दुसऱ्या खोलीत भाड्याने राहत होता आणि विजेच्या केबल विक्रीच्या दुकानात काम करत होता. दहा ऑगस्टला राकेशचा मृतदेह अर्जुनच्या खोलीच्या मागे असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये कचर्‍याच्या ढिगाऱ्यावर आढळून आला होता.

राकेशच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू

पोस्टमार्टम अहवालानुसार राकेशच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी नगर कोतवालीत खुनाची फिर्याद दिली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीचा शोध सुरू केला. शुक्रवारी अखेर पोलिसांनी उमेशला अटक केली आणि त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळवली. एसीपीनुसार, राकेशची हत्या करून उमेशने सुरुवातीला मृतदेह गुंडाळून आपल्या खोलीतील दिवान बेडमध्ये लपवून ठेवला. दरम्यान, राकेशचे भाऊ राजेश आणि महेश त्याला शोधत आरोपीच्या खोलीत आले असता, उमेशने त्यांना खोटे सांगितले की राकेश दोन तासांपूर्वी अज्ञात व्यक्तीसोबत गेला आहे. रात्री उशिरा आरोपीने बेडमधून मृतदेह काढून मागच्या प्लॉटमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून दिला.

चौकशीत उमेशने सांगितले की १० ऑगस्ट रोजी तो आणि राकेश त्याच्या खोलीत बसून दारू पित होते. नशेत राकेशने वारंवार शिवीगाळ सुरू केली. मनाई केल्यानंतरही राकेश थांबला नाही, त्यामुळे उमेशने रागाच्या भरात त्याचे डोके भिंतीवर आपटले. राकेश बेशुद्ध पडल्यावर पकडले जाण्याच्या भीतीने उमेशने शेजारी पडलेली वीट उचलून त्याच्या डोक्यावर वार केले, ज्यामुळे राकेशचा जागीच मृत्यू झाला.

हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तीन पथके तयार केली होती. मात्र मोबाईल बंद केल्यामुळे त्याला पकडणे अवघड होत होते. चौकशीत उमेशने सांगितले की तो हरिद्वार, ऋषिकेश, फरीदाबाद, ललितपूर आणि मथुरामध्ये फिरत होता. तेथे त्याने मजुरी आणि भीक मागून दिवस घालवले. तो कधी कधी वाटसरूंचे मोबाईल घेऊन पत्नीशी संपर्क साधायचा. अखेर तो कोर्टात सरेंडर करण्यासाठी आला असता पोलिसांनी कोर्ट परिसरात सापळा लावून त्याला जेरबंद केले.

आणखी वाचा

Comments are closed.