दोन वर्षांच्या मुलाला घरी ठेवून लॉजवर गेली, प्रियकराने तोंडात स्फोटकं भरली अन्….

म्हैसूर: सध्या विवाहबाह्य संबंधांतून गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. नात्यांतील अविश्वास, खोटं बोलणं आणि सततच्या वादातून जीवघेण्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. कर्नाटकातील मैसूर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना याचं ताजं उदाहरण ठरली आहे. गेरासनहल्ली गावातील 20 वर्षीय रक्षिता हिचं लग्न केरळमधील सुभाष नावाच्या युवकासोबत झालं होतं. तिचा दोन वर्षांचा मुलगाही आहे. मात्र, रक्षिताचं लग्नानंतरही तिचा दूरच्या नातेवाईक असलेल्या सिद्धाराजूसोबत प्रेमसंबंध सुरु होते. हे नातं लग्नापूर्वीचं असून लग्नानंतरही ते दोघं एकमेकांना भेटत राहिले. रक्षिताला सिद्धाराजूसोबत आयुष्य घालवायचं होतं, मात्र कुटुंबियांनी तिचं लग्न सुभाषसोबत लावून दिलं. त्यामुळं लग्नानंतरही त्यांचं बोलणं भेटणं सुरूच राहिलं.(Crime News)

आपल्या दोन वर्षांच्या मुलाला घरीच ठेवून प्रियकरासोबत

शुक्रवारी रक्षिता माहेरी आली होती. तिने आपल्या कुटुंबियांना सांगितलं की, केरळमध्ये राहणाऱ्या तिच्या सासूची तब्येत अचानक बिघडली आहे आणि तिला तिकडे जावं लागेल. प्रत्यक्षात मात्र ती आपल्या प्रियकर सिद्धाराजूसोबत भेटण्यासाठी बाहेर पडली. रक्षिताने आपल्या दोन वर्षांच्या मुलाला घरीच ठेवून प्रियकरासोबत हुंसूरहून के.आर.नगर तालुक्यातील कप्पाडी येथील मंदिरात दर्शनासाठी गेली. त्यानंतर दोघे सालिग्राम भेर्या गावातील एका बार-रेस्टॉरंटमधील लॉजमध्ये पोहोचले.

वादातून त्याने निर्दयपणे रक्षिताच्या तोंडात जिलेटिनची कांडी ठेवून स्फोट घडवला

याच लॉजमध्ये सिद्धाराजूने रक्षिता हिचा खून केला. तपासात समोर आलं आहे की सिद्धाराजूने याआधीच तिची हत्या करण्याचं नियोजन केलं होतं. रुममध्ये गेल्यानंतर झालेल्या वादातून त्याने निर्दयपणे रक्षिताच्या तोंडात जिलेटिनची कांडी ठेवून स्फोट घडवून आणला. या भीषण स्फोटामुळे तिचं चेहरं पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. कांड लपवण्यासाठी सिद्धाराजूने बनाव रचण्याचा प्रयत्न केला. त्याने लॉजच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की रक्षिताचा मृत्यू मोबाईलच्या बॅटरी स्फोटामुळे झाला आहे. मात्र, रक्षिताची अवस्था पाहून कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं. तपासात सत्य उघड झालं आणि सिद्धाराजूचा कट समोर आला.

चौकशीतून खुनामागची खरी कारण समोर येण्याची शक्यता

या प्रकरणामुळे रक्षिताच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांना रक्षिताच्या बाहेर सुरु असलेल्या प्रेमसंबंधांची अजिबात कल्पना नव्हती. पोलिसांनी सिद्धाराजूला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. चौकशीतून खुनामागची खरी कारणं, त्यातील वादाचं मूळ आणि नियोजन याबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

Comments are closed.