नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवा
गुन्हे बातम्या: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमध्ये घडलेल्या सौरभ हत्याकांडात (Meerut Blue Drum Case) मुख्य आरोपी ठरलेल्या मुस्कानने आता आपल्या नवजात मुलीचा चेहरा प्रियकर साहिलला दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी तिने कारागृह प्रशासनाकडे विशेष परवानगीची विनंती केली होती; मात्र तुरुंग नियमांनुसार अशा प्रकारची प्रत्यक्ष भेट घेण्याची तरतूद नसल्याने प्रशासनाने तिचा प्रस्ताव फेटाळून लावला.
सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल या दोघांनी इंदिरानगर परिसरात 3 मार्च 2025 च्या रात्री सौरभची क्रूरपणे हत्या केली होती. सौरभला झोपेची गोळी देण्यात आली. त्यानंतर छातीत वार करून त्याला ठार केले. मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरले आणि त्यावर सिमेंट टाकून बंद करण्यात आले. 18 मार्च रोजी पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आणि दुसऱ्याच दिवशी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. सध्या मुस्कान आणि साहिल मेरठ जिल्हा कारागृहात आहेत आणि खटला जिल्हा न्यायालयात सुरू आहे.
Saurabh Death Case: अटक झाल्यावेळी मुस्कान गर्भवती
मुस्कानला अटक होताच तिची गर्भावस्था उघड झाली. 24 नोव्हेंबर रोजी मेडिकल कॉलेजच्या वॉर्डात तिने एका मुलीला जन्म दिला, जिचे नाव राधा ठेवण्यात आले आहे. सध्या आई आणि मुलगी दोघीही कारागृहातच आहेत. इतर महिला कैद्यांनीही राधाची काळजी घेतल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले आहे. डॉक्टरांच्या अलीकडील तपासणीत दोघीही पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाले.
Saurabh Death Case: साहिलला मुलीचा चेहरा दाखवण्यासाठी विनंती
मुस्कानने कारागृह प्रशासनाला विनंती केली होती की, तिची मुलगी राधा हिला साहिलला भेटू द्यावे आणि तिचा चेहरा त्याला दाखवावा. मात्र कारागृह अधीक्षक डॉ. वीरेश राज शर्मा यांनी सांगितले की, “तुरुंग नियमांनुसार अशा भेटीस परवानगी नाही.” तथापि, न्यायालयीन सुनावणीदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुस्कान मुलीला सोबत आणू शकते, आणि त्या वेळी साहिलला राधाचा चेहरा पाहता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Saurabh Death Case: 14 साक्षीदारांची साक्ष पूर्ण; खटला अंतिम टप्प्यात
सौरभ हत्याकांड प्रकरणातील सुनावणी आता महत्त्वपूर्ण टप्प्यात आली आहे. आतापर्यंत 14 साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवले गेले आहेत. यामध्ये पहिले तपास अधिकारी निरीक्षक करमवीर सिंह यांचाही समावेश आहे. मुख्य साक्षीदारांची संख्या जवळपास संपल्याने हा खटला लवकरच निकालाच्या दिशेने सरकेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Saurabh Death Case: नवीन मातेसाठी पॅरोलची तरतूद; तरीही मुस्कानकडून अर्ज नाही
दरम्यान, नियमांनुसार, नव्याने प्रसूती झालेल्या कैद्यांना सहा महिन्यांपर्यंत पॅरोल मिळू शकते, परंतु मुस्कानने अशा प्रकारचा कोणताही अर्ज अद्याप दाखल केलेला नाही. तुरुंगात आल्यानंतर तिच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने तिची भेट घेतलेली नसल्याने ती सध्या आपल्या नवजात मुलीसहच कारागृहात राहत आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.