प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचं आढळलं कापलेलं शीर अन् बाकी अवयव; कर्नाटकात भयानक हत्याकांड समोर, म
कर्नाटक: कर्नाटकात एक खळबळजनक घटना समोर आली आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील कोराटगेरे येथील कोलाला गावात रस्त्याच्या कडेला काही प्लास्टिक पिशव्यांमध्ये एका महिलेचे कापलेले शीर आणि विद्रूप अवस्थेत कापलेला मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी पीडितेची ओळख पटवली असून ती तुमाकुरु तालुक्यातील बेलावी येथील रहिवासी लक्ष्मीदेवम्मा (वय 42) आहे. ती 4 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. 7 ऑगस्ट रोजी कर्नाटकातील कोराटगेरे येथील कोलाला गावात रस्त्याच्या कडेला एका महिलेचे छिन्नविच्छिन्न अवस्थेत डोकं आणि छिन्नविच्छिन्न शरीर अनेक प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेले आढळून आले, या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
एका कुत्र्याला रस्त्यावरून कापलेला हात ओढताना पाहिला
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, गुरुवारी सकाळी चिंपुगनहल्ली येथील मुत्यालम्मा मंदिराजवळ पहिला शोध लागला, जेव्हा स्थानिकांना जवळच्या झुडुपांमधून एका कुत्र्याला रस्त्यावरून कापलेला हात ओढताना पाहिला. स्थानिकांनी पोलिसांना कळवताच, एक किलोमीटर अंतरावर दुसरा हात सापडला. त्यानंतर 10 वेगवेगळ्या ठिकाणांहून एका महिलेचे डोके आणि इतर छिन्नविच्छिन्न शरीराचे अवयव सापडल्यानंतर घटनास्थळी अधिकच गोंधळ उडाला. अहवालानुसार, पोलिसांना अनेक ठिकाणांहून मृतदेहांचे अवयव सापडले. लिंगपुरा रोड पुलाजवळ आतड्यांचे काही भाग, बेंडोन नर्सरीजवळ पोट आणि इतर अंतर्गत अवयव आणि जोनीगराहल्लीजवळ रक्ताने माखलेली पिशवीसह एक पाय आढळून आला.
10 ठिकाणांहून अवयव सापडले
सिद्धराबेट्टा आणि नेगलाल दरम्यानच्या रस्त्यावर दोन बॅगांमध्ये आणखी मृतदेहांचे अवयव आढळले, असे अहवालात म्हटले आहे. शुक्रवारी दुपारी सिद्धराबेट्टाजवळ पीडितेचे डोके सापडले. कोराटगेरे आणि कोलाला पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या 10 ठिकाणांहून मृतदेहांचे अवयव सापडले. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, हात आणि चेहऱ्यावरील टॅटूच्या आधारे पोलिसांनी पीडितेची ओळख पटवली आहे. 42 वर्षीय लक्ष्मीदेवम्माचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे, ती तुमाकुरु तालुक्यातील बेलावी येथील रहिवासी आहे.
अहवालानुसार, ही महिला 4 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. तिचा पती बसवराजू यांनी बेल्लवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले होते की लक्ष्मीदेवम्मा 3 ऑगस्ट रोजी तिच्या मुलीला भेटण्यासाठी उर्डीगेरे गावात गेली होती, परंतु त्या रात्री ती घरी परतली नाही. दोन दिवसांपूर्वी तिची हत्या करून तिचे तुकडे करण्यात आले होते, असे अहवालात म्हटले आहे. पोलिसांना अद्याप मारेकऱ्याचा शोध लागलेला नाही आणि हत्येचे कारणही सापडलेले नाही.
पोलिसांना संशय…
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मारेकरी कदाचित प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक केलेला मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी कारमधून आले असावेत. त्यांना संशय आहे की हे तुकडे चिंपुगनहल्ली आणि वेंकटपुरा गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर टाकलेले होते. त्यांनी पुढे सांगितले की, महिलेची कदाचित कुठेतरी हत्या झाली असेल आणि मृतदेहाचे तुकडे येथे आणून टाकण्यात आले असतील. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.