तिनं लग्नासाठी नकार दिला; संतापलेल्या तरूणानं तरूणीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, घटनेनंतर एका

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणीने घरामध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. या आत्महत्येमागील (Hyderabad Crime News) कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. एका तरूणाने HIV संक्रमित इंजेक्शन या तरूणीला टोचल्याने (Hyderabad Crime News) तिने हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. मागील महिन्यात तरूणीने आरोपी तरूणाशी लग्न करण्याला नकार दिला. याचाच राग मनात धरून आरोपी तरूणाने तरूणीला इंजेक्शन टोचले. या आरोपीचं नाव मनोहर असून ११ मार्च रोजी ही घटना घडली. आरोपीने तरुणीच्या घरामध्ये जाऊन तिला जबरदस्तीने ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ रक्ताचे इंजेक्शन टोचले होते, ज्याच्या मानसिक धक्क्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचं तिच्या कुटूंबातील सदस्यांनी सांगितलं आहे.(Hyderabad Crime News)

Crime News: नेमकी घटना काय?

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनोहर आणि पीडित तरुणी हे एकमेकांचे नातेवाईक होते. सुरुवातीला त्यांचे लग्न ठरले होते. मात्र, मनोहरचे आई-वडील एचआयव्ही बाधित असल्याचे समजल्यानंतर, तरुणीच्या पालकांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मनोहरची एचआयव्ही चाचणी केली. त्या चाचणीत मनोहर देखील ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ असल्याचे आढळून आले. हे समजताच तरुणीने तात्काळ लग्नास नकार दिला आणि जमलेली सोयरीक तोडली.(Hyderabad Crime News)

लग्नास नकार दिल्याने मनोहर संतापला होता. त्याने ११ मार्च रोजी तरुणीच्या घरात घुसून तिला जबरदस्तीने स्वतःचे एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचले. या धक्कादायक प्रकारानंतर तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यावेळी मनोहरला हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक केली होती.

Crime News: मानसिक तणावातून संपवली जीवनयात्रा

या घटनेला एक महिना उलटल्यानंतर, पीडित तरुणी आपल्या घरात मृतावस्थेत आढळली. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिला एचआयव्ही संसर्ग झाला असण्याची भीती, सामाजिक बदनामीची धास्ती आणि या भयानक अनुभवामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. (Hyderabad Crime News)

Crime News: पोलीस तपास सुरू

हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या आत्महत्येमागे एचआयव्ही संसर्गाचा मानसिक परिणाम आणि सामाजिक कलंक हे मुख्य कारण असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.