वादाने केली सुखी संसाराची राख रांगोळी, आधी नवऱ्याने छातीवर वार करत स्वतःला संपवलं; नंतर बायकोने

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पती-पत्नीत झालेल्या वादातून पतीने स्वतःच्या छातीवर चाकूने वार आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने देखील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.  (Ahilyanagar Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील नवनागापूर येथे खरवाल कुटुंबीय वास्तव्यास आहे. खरवाल पती-पत्नीमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर अनिल खरवाल यांनी टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या छातीवर चाकूने वार करत आपली जीवनयात्रा संपवली.

बायकोनेही मारली इमारतीवरून उडी, उपचार सुरु

पतीच्या आत्महत्येनंतर पत्नी किरण खरवाल यांनी देखील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर अहिल्यानगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे जोडपे मुळचे उत्तर प्रदेश येथील असल्याचे माहिती समोर येत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पती-पत्नीमध्ये नेमका कशावरून वाद झाला? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

कंपनीमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान, राजेंद्र इंडस्ट्रीज जी-107 येथे बाथरूममध्ये एकाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (16 जुलै) घडली. सुभाष मळु नेटके (50 रा. आनंद पार्क, मोरया पार्क जवळ, बोल्हेगाव, अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास, सुभाष नेटके यांनी राजेंद्र इंडस्ट्रीज जी-107 येथील बाथरूममध्ये गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच, त्यांचा मुलगा विकास सुभाष नेटके यांनी त्यांना तातडीने येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी यासंदर्भात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime news: चालत्या बसमधून आईने बाहेर फेकलेल्या बाळाचा पोस्टमार्टम अहवाल आला, चिमुकल्याच्या डोक्यावरच मार बसला अन्…

Maharashtra Honey Trap: 72 सरकारी अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून राजकीय लाभ घेतला? सरकारी फाईल्स बाहेर गेल्या; अंबादास दानवेंचा खळबळजनक आरोप

आणखी वाचा

Comments are closed.