हाय हॅलो करत बसायचं नाही तर, एकच प्रश्न थेट विचारायचा अन्…; अमरावती व्हिडीओकांड प्रकरणातील मा
अमरावती क्राईम न्यूज : अमरावतीच्या परतवाडा येथील बहुचर्चित लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान अहमद याच्याबद्दल दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. केवळ मित्रांमध्ये फुशारकी मारण्यासाठी आणि आपल्या विकृत शौकासाठी अयानने अनेक मुलींना जाळ्यात ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अयानला मुलींशी जवळीक साधण्यासाठी टिप्स देणारा एक ‘लव्ह गुरु’ देखील तपासादरम्यान समोर आला आहे.
Amravati Crime News: ‘लव्ह गुरु’ची विचित्र शिकवण
अयानला मुलींना प्रेमाच्या जाळ्यात कसे ओढायचे, याचे धडे देणारा एक ‘लव्ह गुरु’ होता. तो अयानला शिकवायचा की, मुलींना कधीही ‘हाय-हॅलो’ असे साधे मेसेज करायचे नाहीत. त्याऐवजी त्यांना उत्तर देण्यास भाग पाडणारा एखादा प्रश्न विचारायचा. उदाहरणार्थ, “आप वही हो ना, जो वहा मिले थे?” (तुम्ही तेच ना, जे तिथे भेटले होते?) असा प्रश्न विचारून तो मुलींना चॅटिंग करण्यास भाग पाडत असे. एकदा का संभाषण सुरू झाले की, तो हळूहळू त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा.
Amravati Crime News: 500 रुपयांत मिळायचा विकृत कारनाम्यांसाठी फ्लॅट
अयानने आपल्या विकृत कारनाम्यांसाठी अमरावती शहरातील एका फ्लॅटचा वापर केला होता. मानव सुगंधे या मित्राच्या फ्लॅटवर तो वर्षभरात 7 ते 8 वेळा मुलींना घेऊन गेला होता. पीयूष नावाच्या एका मध्यस्थी मित्राच्या मदतीने अयान आणि मानव यांची ओळख झाली होती. प्रत्येक वेळी 500 रुपये देऊन अयान या फ्लॅटमधील खोलीचा वापर करत असे. पोलिसांनी आता मानव सुगंधेलाही अटक केली आहे.
Amravati Crime News: कॅफेमधील आक्षेपार्ह वर्तन आणि पोलिसांचा शोध
केवळ फ्लॅटवरच नाही, तर अमरावती शहरातील दोन आणि परतवाडा येथील तीन नामांकित कॅफेमध्येही अयानने मुलींसोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचे समोर आले आहे. पोलीस आता या पाचही कॅफे चालकांचा आणि तिथल्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटक केलेल्या आठ आरोपींपैकी अयान मुख्य सूत्रधार आहे. मानव सुगंधे हा फ्लॅट उपलब्ध करुन देणारा, तर उर्वरित सहा आरोपी आक्षेपार्ह व्हिडिओ एकाकडून दुसऱ्याला व्हायरल करणारे आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.