शिवराज दिवटे मारहाण प्रकरण, परळीच्या लिंबोटातील ग्रामस्थ आक्रमक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन
बीड क्राइम न्यूज: परळीच्या लिंबोटा येथील रहिवासी असलेल्या शिवराज दिवटे (Shivraj Divate) या तरुणाला दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने अमानुष केली होती. याप्रकरणी परळी पोलिसांनी (Beed police) सात आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींना अटक करा, याशिवाय समाधान मुंडे (Samadhan Munde) याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी रविवारी सकाळी बीड – परळी मार्गावर ठिय्या घातला आहे. जोपर्यंत सर्व आरोपी अटक होणार नाहीत तोपर्यंत ठिय्या मागे न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे आता बीड पोलीस आणि स्थानिक प्रशासन कशाप्रकारे लिंबोटातील गावकऱ्यांची समजूत काढणार हे बघावे लागेल.
परळीतील जलालपूर येथील मंदिरातील एका समारंभात पंगतीच्या कार्यक्रमात किरकोळ वाद झाल्यानंतर शिवराज दिवटे याचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला होता. समाधान मुंडे आणि त्याच्या टोळक्याने शिवराजला टोकवाडी रस्त्यावरील डोंगरात माळावर नेऊन रिंगण करुन बेदम मारहाण केली होती. लाकडी दांडके, कत्ती आणि काठ्यांनी शिवराज दिवटे याला मारण्यात आले. मारहाण होत असल्यामुळे शिवराज दिवटे जोरात किंचाळत होता. सुदैवाने काही लोकांनी हा प्रकार बघितल्यामुळे शिवराज दिवटे याचा जीव वाचला.
शिवराज दिवटे याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्याला लोखंडी रॉड, कत्ती, बेल्ट आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी परळी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. आरोपींमध्ये समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेष गिरी, प्रशांत कांबळे, सौमित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वागलकर, सुराज्य गित्ते, सूरज मुंडे यांचा समावेश आहे. इतर 11 अनोळखी तरुणांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या टोळक्यात अनेकजण 18 ते 19 या वयोगटातील होते. हे सर्वजण टोकवाडी, डाबी, नंदागौळ, परळी येथील रहिवासी आहेत. आरोपींनी शिवराज दिवटेला मारहाण करतानाचा व्हिडीओ चित्रित करुन ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
Beed news: आरोपींना 20 मेपर्यंत पोलीस कोठडी
समाधान मुंडे,सचिन मुंडे,रोहन वाघुळकर, आदित्य गित्ते तुकाराम गिरी यांना अटक करत परळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे दोन अल्पवयीन आरोपींची रवानगी निरीक्षण गृहामध्ये करण्यात आली आहे.
आणखी वाचा
नाय तुझ्या #%वर तीन कोयते मारले… समाधान मुंडेंची धमकी देतानाची ऑडिओ क्लीप व्हायरल
शिवराजला मारणारे लोक कुणाचे हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट, मी SPना भेटणार; काय म्हणाले धनंजय देशमुख?
अधिक पाहा..
Comments are closed.