मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, बीडमध्ये तरुणाला शरीर काळनिळं पडेपर्यंत मारलं, अखेर जीव सोड
बीड: गेल्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक भयंकर गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेचा केंद्रबिंदु झालेल्या बीड जिल्ह्यात आणखी एका तरुणाचा निर्घृणपणे खून (Beed Murder) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बीडच्या कडा परिसरात एका ट्रकचालक तरुणाचा मृत्यू झाला होता. ट्रकच्या मालकानेच त्याला दोन दिवस डांबून बेदम मारहाण केली होती आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती समोर आली होती. मात्र, आता या प्रकरणाचा एक नवा पैलू समोर आला आहे. मृत ट्रकचालक तरुण विकास अण्णा बनसोडे (वय 23) याचे ट्रकचा मालक असणाऱ्या भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेमसंबंध (Love Relationship) असल्याचा संशय होता. याच संशयातून भाऊसाहेब क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विकास बनसोडे याला अमानुष मारहाण करत त्याची हत्या केली. या मारहाणीत विकासचा (Vikas Bansode) मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपींनी त्याचा मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर आणून ठेवला आणि निघून गेले. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात आणखी एका दुर्दैवी घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी भाऊसाहेब क्षीरसागर यांच्यासह एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विकास बनसोडे याला मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे विकासचे संपूर्ण शरीर काळेनिळे पडले होते. विकास बनसोडे हा गेल्या तीन वर्षांपासून भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रकचालक म्हणून काम करत होता. काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरुन काढण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी विकास आपल्या मित्रांसह पिंपरी या गावात आला होता. ही गोष्ट समजताच विकासचे अपहरण केले आणि त्याला पत्र्याच्या एका शेडमध्ये डांबून ठेवले. याठिकाणी त्याला दोन दिवस बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी दोरी आणि वायरच्या साहाय्याने विकास बनसोडे याला प्रचंड मारले. त्यामुळे विकासच्या मृत शरीरावर काळेनिळे वळ दिसत होते.
बीड पोलिसांकडून तीन आरोपींना अटक
विकास बनसोडे याच्या भावाच्या फिर्यादीवरुन बीड पोलिसांनी एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी भाऊसाहेब क्षीरसागर, स्वाती क्षीरसागर, सुवर्णा क्षीरसागर या तिघांना पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींमध्ये समावेश असलेले बाबासाहेब क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, सुशांत शिंदे आणि बापूराव शिंदे हे अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
विकासच्या फोनवरुन आई-वडिलांना फोन
विकास बनसोडे याला पत्र्याच्या शेडमध्ये डांबून मारहाण केली जात होती तेव्हा त्याच्याच फोनवरुन आई-वडिलांना फोन करण्यात आला होता. फोनवर विकासच्या आई-वडिलांना, ‘लवकर इथे या, आल्यानंतर सांगतो काय झालं ते, असे सांगण्यात आले.
https://www.youtube.com/watch?v=ubxx8sjra4k
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.