छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ


छत्रपती संभाजीनगर वार्ता: छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर (Gangapur) तालुक्यातील भालगाव येथील भाजप (BJP) युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर (Ganesh Temkar) यांचा मृतदेह शुक्रवारी (दि. 14) दुपारी गंगापूर तालुक्यातील हदियाबाद-नारवाडी रस्त्यालगत, नारवाडी शिवारातील नळकांडी पुलाजवळ आढळला. यामुळे संपूर्ण गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. गणेश टेमकर (वय 30) यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

स्थानिक सरपंच आसिफ पटेल आणि समाजसेवक गौरव विधाटे यांनी मृतदेह आढळल्यानंतर गंगापूर पोलिसांना तत्काळ माहिती दिली. पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड, विजय पाखरे, अनिरुद्ध शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे पाठवण्यात आला.

Ganesh Temkar Death: मृत्यूचे कारण अस्पष्ट

गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह आढळला असला तरी, मृतदेहावर कोणत्याही मारहाण किंवा शस्त्राने केलेल्या हल्ल्याचे ठसे आढळले नाहीत. तसेच, कोणत्याही वाहनाने धडक दिल्याचेही स्पष्ट चिन्हे घटनास्थळी आढळली नाहीत. त्यामुळे, अपघातामुळे ही घटना घडली की घातपात झाला यावर संशय व्यक्त केला जात आहे.

Ganesh Temkar Death: पोलिसांकडून तपास सुरू

गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासाअंती शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.

Ganesh Temkar Death: गणेश टेमकर यांची पार्श्वभूमी

गणेश रघुनाथ टेमकर हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू भाजपच्या स्थानिक वर्तुळात धक्का देणारा आहे, आणि त्यांचे निधन झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ते भालगाव येथील रहिवासी होते आणि त्यांच्या अचानक मृत्यूने स्थानिक स्तरावर एक मोठा गोंधळ उडवला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident : ’15 मिनिटांत घरी पोहोचतोय, वाढदिवसासाठी पावभाजीचं सामान घेतलंय’; पण नवले ब्रीजजवळ भीषण अपघात अन् आनंदावर विरजण, भीषण अपघातात कारमधील कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Kalyan News: लहानपणापासून पोलीस वर्दीची क्रेझ, आई-वडिलांनाही खोटं सांगितलं; धाराशिवचा वेटर कल्याण रेल्वे स्थानकावर RPF वर्दीत सापडला, अन्…..

आणखी वाचा

Comments are closed.