दोन घरातील जुना वाद उफाळला, दसऱ्याच्या रात्रीच तरुणाला भोसकलं, मूत्रपिंड फाटलं; जळगावात सणासुदी
जलगाव गुन्हेगारीच्या बातम्या: दसरा (Dasara 2025) सणाच्या रात्री जळगाव (Jalgaon News) शहरातील कासमवाडी (kasamwadi) परिसरात जुन्या वादाने उफाळून येत हिंसक वळण घेतले. दोन कुटुंबांमध्ये मध्यरात्री घडलेल्या वादातून नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील (वय 27) या तरुणावर धारदार शस्त्राने तीन वेळा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (Jalgaon Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी (२ ऑक्टोबर) रात्री उशिरा कासमवाडी परिसरात दोन कुटुंबांमध्ये जुन्या वादातून जोरदार वादावादी झाली. वाद इतका टोकाला गेला की, तो थेट हिंसक हाणामारीत परावर्तित झाला. त्यात नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील या तरुणावर दोन तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ज्ञानेश्वरच्या पोटावर, डाव्या मांडीवर व अंगावर गंभीर स्वरूपाचे वार झाले. पोटावरील वारामुळे त्याचे मूत्रपिंड फाटले होते.
जल्गाव क्राइम न्यूज: उपचारांचा आदर dnyanessaracha mrityu
हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत ज्ञानेश्वरला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र स्थिती गंभीर असल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, सर्व प्रयत्नांना अपयश येत, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Jalgaon Crime News : रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण
घटनेची माहिती समजताच ज्ञानेश्वरचे नातेवाईक, मित्र व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयात जमले. या ठिकाणी मोठा आक्रोश आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात बंदोबस्त वाढवला. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र, दसऱ्याच्या सणाच्या रात्रीच खुनाची घटना घडल्याने जळगावात मोठी खळबळ उडाली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.