पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीने आयुष्य संपवलं, पोलिसांची पहिली मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?


अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांच्या आत्महत्येची बातमी: राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचे 10 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे व्हायची. याच मानसिक तणावातून केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे (Gauri Palve Garje) यांनी आत्महत्या केल्याचे समजते. गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी संध्याकाळी आत्महत्या (Suicide news) केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे गौरी पालवे गर्जे यांचे कुटुंबीय आक्रमक झाले होते. अखेर रविवारी वरळी पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai news)

वरळी पोलिसांनी गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे- आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गौरी पालवे यांना सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. यामध्ये अनंत गर्जे यांच्यासह गौरी पालवे यांची नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांचा समावेश असल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबीयांनी केला होता. गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोपही गौरीच्या वडिलांनी केला होता. याआधारे आता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी संध्याकाळी आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्यांचे नातेवाईक वरळी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. तर अनंत गर्जे अद्याप कुठे आहे, याची माहिती मिळालेली नाही. मात्र, अनंत गर्जे यांनी मी घरात नसताना आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता पोलीस अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक करणार का, हे बघावे लागेल.

आणखी वाचा

मी 30 व्या मजल्यावरच्या खिडकीत उतरुन आत पाहिलं, समोर गौरीचा मृतदेह…. बायकोच्या मृत्यूनंतर अनंत गर्जेंची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा

Comments are closed.