नाशिकमधील 95 टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, इन्स्टा पोस्टमध्ये म्हणाला, तीन वर्षा
नाशिक गुन्हेगारी बातम्या: “मित्रांनो, ही शेवटची वेळ आहे… माझ्या आयुष्यात आता कोणतेही ध्येय किंवा स्वप्न उरलेले नाही… माझं अस्तित्व अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे… साइनिंग ऑफ फ्रॉम लाइफ…” अशी हृदयद्रावक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास गंगापूर रोडवरील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.
गंगापूर पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट तपासासाठी महत्त्वाची ठरत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Nashik Crime News: दहावीमध्ये 95 टक्क्यांहून अधिक गुण
मृत विद्यार्थी पाथर्डी फाटा परिसरात पालकांसोबत राहत होता. त्याचे वडील एका खासगी कंपनीत काम करत असून तो त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. काही आठवड्यांपूर्वीच त्याने गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळवत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. दहावीमध्ये त्याने 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काही काळाने त्याने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली. त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
Nashik Crime News: काय होती शेवटची पोस्ट?
“हाय गाइज… तुम्ही मला शेवटचं ऐकत आहात. आयुष्यातील माझा इंटरेस्ट संपला आहे. माझ्या आयुष्यात आता कोणतंही ध्येय किंवा स्वप्न शिल्लक नाही. माझ्यामुळे अनेकांना त्रास झाला आहे. तीन वर्षांपूर्वीच मी मरणार होतो, पण माझ्या गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्ष जगलो. शाळेपासूनच मी नैराश्य आणि मानसिक त्रासात होतो. आता मात्र तो टोकाला पोहोचला आहे.
माझ्या कुटुंबीय, मित्र आणि हितचिंतकांचे मनापासून आभार. तुम्ही काहीच चुकीचं केलं नाही, मीच पात्र नव्हतो. तुमचे सर्व प्रयत्न मी वाया घातल्याबद्दल क्षमस्व. सॉरी… साइनिंग ऑफ फ्रॉम लाइफ. गुड बाय…” असे विद्यार्थ्याने शेवटच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Nashik Crime News: सोशल मीडियावर प्रतिक्रिया
या पोस्टनंतर काही मित्रांनी त्याला समजावत, “अरे, अभ्यास कर. वेडेपणा करू नको” अशा स्वरूपाच्या कमेंट्स केल्याचंही उघड झालं आहे. मात्र तोवर वेळ निघून गेली होती.
Nashik Crime News: पोलिसांकडून तपास सुरू
पोस्टमध्ये व्यक्त केलेली भावना आणि उल्लेखांमधून त्याच्या मानसिक अवस्थेचा अंदाज घेत गंगापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले, तरी विद्यार्थ्याच्या आत्महत्येने महाविद्यालय, परिसर आणि विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.