आयुष कोमकरवर गोळ्या झाडल्यानंतर ‘टपका रे टपका’ गाणं कुठे लागलं होतं? लहान भावाने सगळं सांगितलं
पुणे गुन्हे आयश कोमकर: पुण्यातील नाना पेठ परिसरात 5 सप्टेंबरच्या रात्री टोळीयुद्धातून आयुष कोमकर या तरुणाची हत्या करण्यात आली होती. वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आरोपीचा मुलगा असणाऱ्या आयुष कोमकरला (Ayush Komkar Murder) संपवले होते. आयुष कोमकर हा अवघ्या 19 वर्षांचा होता. त्याचा गुन्हेगारी जगताशी कोणताही संबंध नव्हता. मात्र, बंडू आंदेकरने (Bandu Andekar) मुलाच्या जाण्याचे दु:ख काय असते, हे समजावे यासाठी आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आणि स्वत:चा नातू आयुष कोमकरला संपवले. या हत्येसाठी अत्यंत नियोजनबद्द पद्धतीने कट रचण्यात आला होता. कारण, मारेकऱ्यांनी आयुष कोमकरला गोळ्या घालून ठार मारल्यानंतर या परिसरात स्पीकरवर ‘टपका रे टपका, एक और टपका’ हे गाणे वाजत होते. या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली होती. या सगळ्याविषयी आयुष कोमकरचा लहान भाऊ अर्णव कोमकर (Arnav Komkar) याने एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महत्त्वाची माहिती दिली.
ज्यादिवशी आयुषची हत्या झाली तेव्हा तो त्याचा लहान भाऊ अर्णव कोमकर याला क्लासमधून घरी आणण्यासाठी गेला होता. त्याला घराच्या खाली आणल्यानंतर आयुष कोमकर पार्किंगमध्ये गाडी लावत असताना त्याच्यावर जवळपास 12 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यापैकी नऊ गोळ्या आयुष कोमकरच्या शरीरात शिरल्या होत्या. त्यावेळी अर्णव कोमकर हा जवळच होता. त्याने सांगितले की, पहिल्या दोन गोळ्या लागल्यावरच आयुष जमिनीवर पडला. त्यानंतर पोलिसांना येण्यासाठी अर्धा तास गेला. रुग्णवाहिका 40 ते 50 मिनिटांनी आली. तोपर्यंत आमच्या बिल्डिंगमधील एक डॉक्टर होते, त्यांनी आयुषला तपासले. ते रुग्णवाहिका बोलावण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, ही पोलीस केस असल्याचे सांगण्यात आले. तोपर्यंत आयुषचा मृतदेह तिकडेच पडून होता, असे असे अर्णव कोमकरने सांगितले.
इयस कोमकर मर्ड्स: आयुषच्या किलरमध्ये 'टेपका रे तपका, एक लिपका' गाणे होते?
आंदेकर टोळीच्या दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलमधून जवळपास 12 राऊंड फायर केले. यापैकी अमन पठाण याने एकट्याने आयुषवर 8 गोळ्या झाडल्या. आयुषची हत्या झाली तेव्हा या परिसरात ‘टपका रे टपका, एक और टपका’ हे गाणे स्पीकरवर लावण्यात आले होते. याविषयी अर्णव कोमकर याला विचारले असता त्याने सांगितले की, ‘ते गाणं इकडे लागलं नव्हतं, ते गाणं आंदेकर चौकात लागलं होतं. आयुषवर गोळ्या झाडल्या तेव्हा माझी आई कल्याणी कोमकर आणि बहीण अक्षता कुमकर दोघेही घरात होते. आयुषवर गोळ्या झाडून तिथून निघताना दोन्ही मारेकऱ्यांनी म्हटले की, इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू आंदेकर चालणार बाकी कोण नाय. आमच्या नादाला लागणार त्यांचं असंच होणार, असेही अर्णव कोमकर याने सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=oikfgsggqn4
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.