नवरा घराबाहेर गेला, आईने चिमुकल्याच्या गळ्यावर चाकू फिरवला, पुण्यातील वाघोलीत भयंकर घटना
पुणे क्राईम न्यूज वाघोली खून प्रकरण: पुण्यातील वाघोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका आईने स्वतःच्या 11 वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा चाकूने गळा चिरून खून (Murder news) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत मृत मुलाचे नाव साईराज संतोष जायभाय असून आरोपी आईचे नाव सोनी संतोष जायभाय आहे.
मुलाचा खून केल्यानंतर आरोपी महिलेने 13 वर्षांच्या मुलीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत मुलगी घराबाहेर पळाली आणि आरडाओरडा केला. मुलीचा आवाज ऐकताच शेजारी मदतीसाठी धावून आले. शेजाऱ्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पाहिलेलं दृश्य अंगावर काटा आणणारं होते. आईनेच आपल्या मुलाचा चाकूने गळा चिरून निर्घृणपणे खून केल्याचं स्पष्ट झालं. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि आरोपी महिलेला ताब्यात घेतलं. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे.पोलिसांनी आजूबाजूच्या नागरिकांची आणि नातेवाइकांची चौकशी केली असता, कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र नेमकं कारण काय, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. (Pune Murder news)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला सोनी जायभाय ही एका खाजगी मॉलमध्ये कामाला होती. काही दिवसांपूर्वीच तिने नोकरी सोडल्याची माहिती आहे. तिचा पती संतोष जायभाय हा मिळेल ते काम करतो. घटनेच्या दिवशी सकाळी तो कामानिमित्त घराबाहेर गेला असताना, घरातच हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. सध्या पोलिसांकडून संबंधित महिलेची चौकशी सुरु असून त्यामधून आणखी कोणती माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.