दुबई ते ऑस्ट्रेलिया, अशोक खरातचे हजारो कोटीचे हवाला रॅकेट; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, ईडीचे न
अशोक खरात प्रकरणावर रोहित पवार स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) पापाचा घडा आता भरत चालला असून, त्याच्याविरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले आहेत. आता अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खळबळजनक आरोप केलाय. भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबई यासह चार पाच देशात हवालाच्या माध्यमातून ‘मनी लाँड्रिंग’ करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर या प्रकरणाची ईडी (ED) सारख्या केंद्रीय यंत्रणांनी तातडीने चौकशी करावी, अशी मागणी पवारांनी केली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबई यासह चार पाच देशात हवालाच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग करत असल्याची तसंच खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारून अधिक कोटी या देशांमध्ये पाठवले असल्याचं कळत आहे. खरात हा केवळ भोंदू नाही तर एक मोठे’नेक्सस’आहे, असा आरोप त्यांनी केलाय.
भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबई यासह चार पाच देशात हवालाच्या माध्यमातून Money Laundering करत असल्याची तसंच खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारून अधिक कोटी या देशांमध्ये पाठवले असल्याचं कळत आहे. खरात हा केवळ भोंदू नाही तर एक मोठे nexus आहे, त्यामुळे या प्रकरणाची…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 4 एप्रिल 2026
Rohit Pawar on Ashok Kharat Case: या प्रकरणातही ED सारख्या यंत्रणांना जाग येईल, ही अपेक्षा
या प्रकरणाची केंद्रीय संस्थानी सुद्धा चौकशी करणे गरजेचं आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा आवाहन देणारा असल्याने राज्य सरकारकडे पुरेसे पुरावे आले असतील तर गृह विभागाने देखील या प्रकरणाचा राजकीय गोळाबेरजेसाठी वापर न करता सखोल चौकशी केली पाहिजे. असो! या प्रकरणातही ED सारख्या यंत्रणांना जाग येईल, ही अपेक्षा, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, आधीच लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या 12 गुन्ह्यांनी वेढलेल्या अशोक खरातसाठी रोहित पवारांचे हे आरोप मोठी अडचण ठरू शकतात. आता या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा एन्ट्री घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.