दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने बसमध्ये…; आरोपी दत्ता गाडेचे वकील काय काय म्हणाले?
स्वारगेट बस डेपो प्रकरण: स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील (Pune Swargate Depot Case) आरोपी नराधम दत्ता गाडेला (Datta Ghade) पुणे न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिरुरमधून त्याला अटक करण्यात आली होती आणि पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आरोपी दत्ता गाडेचे वकील सूमित पोटे आणि अजिंक्य महाडीक यांनी माध्यामांशी संवाद साधताना खळबळजनक दावा केला.
बलात्कार झालाचं नाही. जे झालं ते दोघांच्या संमतीने झाले. दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यापासुन ओळखतात. त्यांचे कॉल रेकॉर्डस काढले तर समजेल. बसमधून दोघे एकत्रच उतरले. बसमधून उतरुन दोघे कुठे गेले याची माहिती घेण्यात यावी, असं आरोपी दत्ता गाडेचे वकीलांनी सांगितले. तसेच दोघांमध्ये पैशाचा वाद झाला. दत्ता गाडे पळून गेला नाही तर त्याच्या गावी आला. गावाला पोलीस छावणीचे रुप आल्याने तो दडून बसला, अशी माहितीही दत्ता गाडेचे वकीलांनी दिली.
सरकारी वकिलांनी कोणता युक्तिवाद काय?
आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यापैकी 5 गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत. त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होते आहे. या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपचा आहे. आरोपी सराईत असल्याने त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेले आहे का हे तपसायचे आहे. त्याचबरोबर आरोपीला मदत करणारे आणखी काहीजण त्याच्यासोबत आहेत का हे तपासायचे आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक आहे. सरकारी वकिलांनीही याआधी गुन्ह्याची आणि आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. आतापर्यंत या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे तसेच आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत. आरोपीने तरुणीला कडेंक्टर असल्याचं भासवत विश्वास संपादन केला. बसमध्ये अनेक लोक असल्याचं त्याने भासवले. पण बस पूर्ण रिकामी होती. फिर्यादीने बसमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने बाहेर सोडा अशी विनंती केली. पण आरोपीने जबरदस्तीने अत्याचार केला. मारहाण करून दोन वेळा लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो पळून गेला.
संबंधित बातमी:
Pune Swargate Bus Depot Case: पुणे बलात्कार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
अधिक पाहा..
Comments are closed.