कुरकुरीत आणि चवदार पनीर नगेट्स! घरीच बनवा परिपूर्ण नाश्ता, रेसिपी लक्षात ठेवा

मुलांना न्याहारी किंवा दुपारच्या जेवणात नेमके काय द्यावे? हा प्रश्न नेहमीच सर्व पालकांकडून विचारला जातो. मुलांना कांदापोहे, इडली, डोसा, उपमा, शिरा खाऊन कंटाळा येतो. लहान मुलांना न्याहारी किंवा दुपारच्या जेवणात चमकदार आणि मसालेदार पदार्थ खायला आवडतात. सकाळी उठल्यानंतर मनसोक्त नाश्ता केल्याने संपूर्ण दिवस आनंदी आणि उत्साही होतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासोबत नाश्ता किंवा मुलांच्या जेवणाच्या डब्यात कुरकुरीत पनीर नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पनीर पकोडा, पालक पनीर, मटर पनीर, पनीर कचोरी इ. तुम्ही कमीत कमी घटकांसह पनीर नगेट्स पटकन बनवू शकता. वजन कमी करताना, न्याहारीसाठी काय खावे हे अनेकदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही पनीरपासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता. पनीर नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.(छायाचित्र सौजन्य – istock)
मुलांसाठी पौष्टिक चिकन व्हेज रॅप बनवा, संध्याकाळच्या स्नॅकसाठी चविष्ट बीट
साहित्य:
- पनीर
- पीठ
- कॉर्नफ्लोर
- ब्रेड crumbs
- आले लसूण पेस्ट
- काळी मिरी पावडर
- चाट मसाला
- लाल मिरची
- मीठ
- तेल
गरम चहासोबत कुरकुरीत खायचे असल्यास भातापासून कुरकुरीत पकोडे बनवा, रेसिपी लक्षात घ्या
कृती:
- पनीरचे नगेट्स बनवण्यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात पनीरचे धुवून घेतलेले तुकडे घ्या.
- नंतर त्यात काळी मिरी पावडर, तिखट, चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि धनेपूड घालून मिक्स करा.
- पनीरचे मिश्रण मिक्स करून 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा. यामुळे मसाल्यांमध्ये पनीर मिसळेल.
- एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, चिमूटभर मीठ आणि पाणी एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा.
- तयार पेस्टमध्ये मसाल्यात मिसळलेले पनीरचे तुकडे घालून मिक्स करा. त्यानंतर ब्रेड क्रंबमध्ये पनीरचे तुकडे टाका आणि मिक्स करा.
- गरम तेलात पनीरचे तुकडे घालून दोन्ही बाजूंनी चांगले परतून घ्या.
- सोप्या पद्धतीने बनवलेले पनीर नगेट्स तयार आहेत. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.
Comments are closed.