अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी झुंबड… बीड येथे पोलिसांचा लाठीमार

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांची आज धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बीडमध्ये तर नगरपालिका भवनात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी झुंबड उडाली. त्यामुळे प्रशासनाची दमछाक झाली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, लाठीमाराचा पोलिसांनी मात्र इन्कार केला आहे.

Comments are closed.