CSK मधून 3 बड्या मॅचविनर्सची सुट्टी? लिस्टमध्ये धोनीच्या आवडत्या 1 विदेशी अन् 2 भारतीय खेळाडूंच

CSK IPL 2026 नंतर 3 खेळाडू सोडू शकते: चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल 2026 हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे गुजरात टायटन्सकडून 89 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सीएसकेचे प्लेऑफचे स्वप्न भंगले. सुरुवात खराब झाल्यानंतर संघाने दमदार पुनरागमन केले होते, मात्र अखेरीस गुणतालिकेत 7व्या स्थानावर राहून त्यांचा प्रवास संपला. आता या निराशाजनक हंगामानंतर फ्रेंचायझी काही मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत असून 3 खेळाडूंना रिलीज करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dewald Brevis (Dewald Brevis CSK IPL 2026)

‘बेबी एबी’ म्हणून ओळखला जाणारा डेवाल्ड ब्रेविस याच्याकडून सीएसकेला मोठ्या अपेक्षा होत्या. आक्रमक फलंदाजी आणि वेगवान रनगतीमुळे तो संघासाठी एक्स-फॅक्टर ठरू शकतो, अशी चर्चा होती. मात्र आयपीएल 2026 मध्ये त्याला प्रभाव पाडता आला नाही. ब्रेविसने 11 सामने खेळत 127.97 च्या स्ट्राइक रेटने आणि 18.88 च्या सरासरीने केवळ 151 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्यामुळे पुढील हंगामापूर्वी सीएसके हा विदेशी खेळाडू रिलीज करू शकते.

प्रशांत वीर (CSK IPL 2026)

सीएसकेने प्रशांत वीरवर तब्बल 14.20 कोटी रुपयांची मोठी बोली लावत संघात सामील केले होते. त्याला भविष्यातील रवींद्र जडेजाचा पर्याय मानले जात होते. पण मैदानावर मात्र तो अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. प्रशांतने 6 सामने खेळले. त्यातील 3 डावांत 134.33 च्या स्ट्राइक रेटने आणि 45 च्या सरासरीने 90 धावा केल्या. गोलंदाजीतही त्याला प्रभाव टाकता आला नाही. त्याने 2 षटके टाकली, पण एकही विकेट मिळवू शकला नाही. त्यामुळे इतक्या महागड्या खेळाडूला रिलीज करून सीएसके आयपीएल 2027 च्या लिलावात नवा पर्याय शोधू शकते.

मुकेश चौधरी (मुकेश चौधरी CSK IPL 2026)

वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीचाही सीएसके च्या रिलीज यादीत समावेश होऊ शकतो. आयपीएल 2026 मध्ये त्याची कामगिरी अत्यंत साधारण राहिली. मुकेशने 8 सामने खेळताना 31.13 च्या सरासरीने 8 विकेट्स घेतल्या. मात्र त्याची इकॉनॉमी 8.89 इतकी महागडी ठरली. महत्त्वाच्या क्षणी धावा रोखण्यात तो अपयशी ठरल्याने पुढील हंगामापूर्वी सीएसके त्याला बाहेरचा रस्ता दाखवू शकते.

हे ही वाचा –

IPL Playoff Rules : हरली तरी जिंकली RCB! आता फायनलमध्ये पोहोचणं झालं आणखी सोपं; प्लेऑफचं गणित पाहून चाहतेही थक्क

आणखी वाचा

Comments are closed.