IPL 2025: 28 चेंडूत शतक ठोकणारा धुरंधर चेन्नईच्या ताफ्यात दाखल! 'या' खेळाडूच्या जागी मिळाली संधी
यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जची (CSK) कामगिरी खूपच खराब राहिली आहे. संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. संघाने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये फक्त 2 विजय मिळवले आहेत. टॉप 4च्या आशा संपल्यानंतर, चेन्नई संघ युवा खेळाडूंना आजमावत आहे आणि त्यांना सतत संधी देत आहे. दरम्यान वंश बेदीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (RCB) संधी मिळणार होती पण तो सामन्यापूर्वीच दुखापतग्रस्त झाला. आता हा युवा खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर आहे.
अशा परिस्थितीत, चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या जागी गुजरातचा यष्टीरक्षक फलंदाज उर्विल पटेलला (Urvil Patel) करारबद्ध केले आहे. उर्विलला करारबद्ध करण्याची चर्चा बऱ्याच काळापासून होती पण आता आयपीएलनेही त्याची घोषणा केली आहे.
चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये डाव्या घोट्यातील लिगामेंट फुटल्यामुळे वंश बेदीला टाटा आयपीएल 2025च्या उर्वरित सामन्यांमधून वगळण्यात आले आहे.
यानंतर, फ्रँचायझीने आणखी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये उर्विल पटेलला करारबद्ध करण्याची माहिती देण्यात आली. उर्विलचे नाव गेल्या काही काळापासून स्थानिक क्रिकेटमध्ये चर्चेत आहे. या खेळाडूच्या नावावर टी20 फॉरमॅटमध्ये दुसरे सर्वात जलद शतक आहे. 2024 मध्ये त्रिपुराविरुद्ध फक्त 28 चेंडूत शतक ठोकून उर्विलने खळबळ उडवून दिली. त्यानंतर, आयपीएल मेगा लिलावात त्याला खरेदी करण्यासाठी संघांमध्ये स्पर्धा होण्याची अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही आणि तो विकला गेला नाही. पण, आता त्याचे नशीब चमकले आहे आणि चेन्नई सुपर किंग्जने त्याला त्यांच्या संघाचा भाग बनवले आहे.
Camp कॅम्प अद्यतन 🚨
डाव्या घोट्याच्या अस्थिबंधनामुळे वानश बेदीने टाटा आयपीएल 2025 च्या उर्वरित भागातून राज्य केले.
त्याला त्वरित पुनर्प्राप्ती शुभेच्छा. 💛 pic.twitter.com/i3kkoei2pj
– चेन्नई सुपर किंग्ज (@चेन्नईआयपीएल) 5 मे, 2025
चेन्नई फ्रँचायझीने उर्विलला 30 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर करारबद्ध केले आहे. त्याने 47 टी20 सामने खेळले आहेत आणि 1,162 धावा केल्या आहेत. उर्विल आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. पण, त्याला त्यावेळी पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.
Comments are closed.