रवींद्र जडेजासह 5 खेळाडूंना सीएसके रिलीज करणार? ऑक्शनपूर्वी चेन्नईत मोठे फेरबदल होण्याची शक्यता

आयपीएल 2026 (IPL 2026) साठी रिटेन्शन लिस्ट सादर करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. प्रत्येक संघाला आपली रिटेन्शन लिस्ट 15 नोव्हेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहे. मागील वेळेपेक्षा यावेळी नियम थोडे वेगळे असतील, कारण या वेळेस कोणताही संघ आपल्या इच्छेनुसार कितीही खेळाडूंना कायम ठेवू शकतो. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष त्या खेळाडूंवर आहे, ज्यांना टीम रिलीज करू शकते. चला तर पाहूया, ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कोणत्या खेळाडूंना टीममधून बाहेर करू शकते.

रवींद्र जडेजा

पहिलं नाव समोर येतं आहे रवींद्र जडेजाचं. जडेजा, संजू सॅमसन ट्रेड डीलचा भाग बनून राजस्थान रॉयल्सकडे जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. जडेजाने CSK साठी तब्बल 10 हंगाम खेळले आहेत, पण अलीकडच्या रिपोर्ट्सनुसार तो पुढच्या हंगामात राजस्थानकडे खेळू शकतो.

सॅम कुरन

ज्या ट्रेड डीलमध्ये जडेजाचा समावेश असू शकतो, त्यातच अष्टपैलू सॅम करनचं (Sam Karan) नावही घेतलं जात आहे. असा अंदाज वर्तवला जातोय की, संजू सॅमसनच्या बदल्यात चेन्नई सुपर किंग्ज रवींद्र जडेजा आणि सॅम करनला राजस्थान टीममध्ये पाठवू शकते.

राहुल त्रिपाठी

CSK कडून रिलीज होऊ शकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुल त्रिपाठीचं (Rahul Tripathi) नावही समोर आलं आहे. गेल्या हंगामात चेन्नईने त्याला 3.4 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. पण त्रिपाठीने संपूर्ण हंगामात फक्त 5 सामने खेळले आणि केवळ 55 धावा केल्या.

विजय शंकर

विजय शंकरने (Vijay Shankar) आयपीएल 2025 मध्ये तब्बल 11 वर्षांनंतर CSK मध्ये पुनरागमन केलं, पण कामगिरी निराशाजनक ठरली. फ्रँचायझीने त्याच्यावर 1.2 कोटी रुपयांचा खर्च केला होता, तरीही तो 6 सामन्यांत फक्त 118 धावा करू शकला.

श्रेयस गोपाळ

अष्टपैलू श्रेयस गोपाल (Shreyas Gopal) आयपीएल 2025 मध्ये एकही सामना खेळू शकला नाही. टीममध्ये आधीच अनेक स्टार खेळाडू असल्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. त्यामुळे पुढच्या हंगामातही त्याचं स्थान धोक्यात येऊ शकतं.

Comments are closed.