CSK vs DC: चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल? 14 कोटींचा खेळाडू होणार बाहेर!
आयपीएल 2026 मधील 18वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या हंगामात चेन्नईची सुरुवात खूपच खराब झाली असून त्यांनी खेळलेल्या तिन्ही सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे या सामन्यात संघ काही बदल करताना दिसू शकतो. या लढतीत पहिला विजय मिळवण्याचा चेन्नईचा निर्धार असेल.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी संघात डेवाल्ड ब्रेविस याची पुनरागमन होण्याची शक्यता आहे. तो पूर्णपणे फिट झाला असून त्याची थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये एंट्री होऊ शकते. त्याच्या येण्यामुळे कार्तिक शर्माला बाहेर बसावे लागू शकते. गोलंदाजी विभागातही बदल होण्याची शक्यता आहे. नूर अहमद अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही, त्यामुळे त्याच्या जागी अकील हुसैन याला संधी मिळू शकते. हुसैन हा अष्टपैलू खेळाडू असून तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये योगदान देऊ शकतो.
फलंदाजीत ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांची खराब फॉर्म ही मोठी चिंता आहे. आतापर्यंत तिन्ही सामन्यांत या दोघांकडून अपेक्षित धावा झालेल्या नाहीत. त्यामुळे संघाला चांगली सुरुवात मिळालेली नाही. चेन्नईला या स्पर्धेत पुनरागमन करायचे असेल, तर या दोघांनी धावा करणे खूप गरजेचे आहे. आयपीएलपूर्वी झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण तीच कामगिरी तो आयपीएलमध्ये करू शकलेला नाही.
चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, सरफराज खान, शिवम दुबे, देवाल्ड ब्रेविस, अकील हुसेन, अंशुल कंबोज, मॅट हेन्री, खलील अहमद.
Comments are closed.