एका विजयाने बदलणार सगळं समीकरण! ऋतुराजसाठी प्लेऑफचं तिकीट, तर पंतच्या अस्तित्वाची लढाई, जाणून घ
Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live Update IPL 2026 In Marathi : आयपीएलच्या 19व्या हंगामातील 53वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगणार आहे. हा थरारक मुकाबला चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार असून, लखनऊ सुपर जायंट्सची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर असेल.
चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले तर 5 सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. 10 गुणांसह सीएसके सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सची अवस्था अत्यंत बिकट झाली असून संघ दहाव्या स्थानावर घसरला आहे. लखनऊला 10 पैकी केवळ 3 सामन्यांत विजय मिळवता आला असून त्यांच्या खात्यात फक्त 6 गुण आहेत. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
चेन्नईसाठी मात्र हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सीएसकेला हा विजय कोणत्याही परिस्थितीत हवा आहे. सध्या स्पर्धा निर्णायक टप्प्यात पोहोचली असून प्रत्येक सामना ‘करो या मरो’सारखा बनला आहे. पाच वेळा आयपीएल जिंकलेल्या चेन्नईच्या संघाला या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. घरच्या मैदानावर आणि बाहेरच्या मैदानावरही अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करण्यात संघ अपयशी ठरला आहे.
मात्र आता चेपॉकवर पुनरागमन करताना सीएसकेसमोर पुन्हा लय पकडण्याची सुवर्णसंधी आहे. लखनौविरुद्ध दमदार विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्ससाठी हा हंगाम निराशाजनक ठरला असून संघ जवळपास स्पर्धेबाहेर गेला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघ : संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, जेमी ओव्हरटन, अकेल होसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग, एमएस धोनी, मॅट हेन्री, सरफराज खान, मॅथ्यू शॉर्ट, श्रेयस गोपाल, शिवम दुबे, राहुल चहर, स्पेन्सर जॉन्सन, आकाश मधवाल, अमन खान, झकेरी फॉल्केस, प्रशांत वीर
लखनौ सुपर जायंट्स असोसिएशन : मिचेल मार्श, अर्शिन कुलकर्णी, निकोलस पूरन, एडन मार्कराम, ऋषभ पंत, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेश सिंग राठी, मोहम्मद शमी, प्रिन्स यादव, मयंक यादव, आवेश खान, जॉर्ज लिंडे, जोश इंग्लिस, ॲनरिक मोथेरन, मॅन ब्रेथ, मॉन्थ ब्रेथ्स, मॅनक यादव. खान, अर्जुन तेंडुलकर, आयुष बडोनी, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, मुकुल चौधरी, नमन तिवारी.
हे ही वाचा –
Comments are closed.