सरफराज खानला विकत घेतल्यास सीएसकेला फायदा! धोनीच्या जिवलग मित्राने का केले असे विधान?
सरफराज खानने अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने वेगवान शतक आणि अर्धशतके झळकावून पुढील आयपीएल सीझनसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. लिलावाच्या दिवशीही त्याने राजस्थानविरुद्ध 22 चेंडूंमध्ये 73 धावांची जबरदस्त खेळी केली होती. आता, चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) माजी खेळाडू आणि महेंद्र सिंह धोनीचा खास मित्र सुरेश रैना यानेही सरफराज खानच्या बाजूने बॅटिंग केली आहे. त्याचे असे मत आहे की, सरफराज खान चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो.
सुरेश रैना यांचे मत आहे की, सीएसकेने (CSK) आयपीएल 2026 च्या मिनी-लिलावात सरफराज खानला लक्ष्य करण्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. त्यांचा तर्क आहे की, मुंबईच्या या फलंदाजाची सध्याची देशांतर्गत (डोमेस्टिक) फॉर्म त्याला एक मूल्यवान पर्याय (Valuable Auction Pick) बनवते.
ईपीएल (IPL) 2026 ऑक्शन वॉर रूममध्ये बोलताना, रैना यांनी जोर दिला की, सध्याच्या फॉर्मचे महत्त्व हे केवळ नावापेक्षा (Reputation) अधिक असायला हवे, विशेषत: मिनी-ऑक्शनच्या परिस्थितीत. त्यांनी पूर्वीच्या मोठ्या-खर्चिक खरेदींची तुलना केली, ज्यांच्या फॉर्मने लगेच त्यांच्या किंमतीचे समर्थन केले नाही, तर दुसरीकडे सरफराजचा आत्मविश्वास (Confidence), शॉट रेंज आणि तत्काळ योगदान देण्याची इच्छा यावर त्यांनी विशेष भर दिला.
रैना म्हणाले, ‘माझ्या मते, तो (सरफराज) उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आम्ही यापूर्वी पाहिले आहे की, जेव्हा व्यंकटेश अय्यरला मोठी रक्कम देऊन खरेदी केले गेले होते, तेव्हा त्याचा फॉर्म पुरेसा नव्हता. याउलट, सरफराज सध्या खरोखरच चांगली फलंदाजी करत आहे. तुम्हाला त्याच्यासारखा खेळाडू इतक्या सहज मिळत नाही, तो जेवढे शॉट्स खेळतो, त्याच्याकडे आत्मविश्वास (Confidence) आहे.’
Comments are closed.